नवी दिल्ली | वृत्तसंस्था New Delhi
संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. केंद्र सरकारने पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी आज (19 जुलै) सर्वपक्षीय बैठक बोलावली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. ही बैठक संसद भवनाच्या परिशिष्टात सुरू झाली. या बैठकीला काँग्रेस, समाजवादी पक्ष, टीएमसी आणि डीएमकेसह 10 हून अधिक विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते.
मात्र, 15 मिनिटांनंतर विरोधी पक्षाचे खासदार सभात्याग करून बाहेर पडले. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अद्याप 20 बंडखोर टीएमसी खासदारांच्या गटाला मान्यता दिलेली नसताना सरकारने त्यांना बैठकीसाठी आमंत्रित केले, असा विरोधी पक्षांचा आरोप आहे. मात्र, हा सभात्याग प्रतिकात्मक होता. विरोधी पक्षाचे खासदार पुन्हा बैठकीत सामील झाले.
परराष्ट्र धोरण, महागाई, आणि विविध घटनादुरुस्तीं, सध्या राम मंदिर दान चोरीचा मुद्दा चर्चेत आहे. त्याच प्रमाणे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणी साठी सोनं वांगचुक यांचे आंदोलन, अनेक मुद्यांवर विरोधक घेरण्याच्या तयारीत आहेत. मतदारसंघ फेररचना विधेयक पुन्हा येण्याची शक्यता असून सरकार कोणती विधेयकं मंजुरीसाठी पटलावर ठेवणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.




