Thursday, November 19, 2026
Homeब्रेकिंग न्यूजOnion : लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याच्या आवकेत वाढ; कांदा दरात घसरण

Onion : लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याच्या आवकेत वाढ; कांदा दरात घसरण

लासलगाव | वार्ताहर Lasalgaon

- Advertisement -

कांद्याचे आगार म्हणून ओळख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसह नाशिक जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याच्या आवकेत वाढ होत असल्याने कांद्याच्या दरावर दबाव निर्माण झाला आहे. बुधवारच्या तुलनेत आज गुरुवार लाल कांद्याच्या कमाल दरात प्रति क्विंटल ३०० रुपयांची घसरण होऊन दर ५ हजार ७०० रुपयांवरून ५ हजार ४०० रुपयांपर्यंत खाली आले. तर जुन्या उन्हाळ कांद्याच्या कमाल दरात प्रतिक्विंटल १४४ रुपयांची घसरण होऊन दर ४ हजार ५३५ रुपयांवरून ४ हजार ३९१ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

लासलगाव बाजार समितीमध्ये गुरुवारी लाल कांद्याची २३१ वाहनांमधून ३३६४ क्विंटल आवक झाली. कांद्याला प्रतिक्विंटल कमाल ५ हजार ४०० रुपये, किमान १ हजार ८५२ रुपये, सरासरी ४ हजार ७०० रुपये दर मिळाला. उन्हाळ कांद्याची १४७ वाहनांमधून २१०२क्विंटल आवक झाली. कमाल ४ हजार ३९१ रुपये, किमान १ हजार ५०० सरासरी ४ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

लाल कांद्याची आवक दिवसेंदिवस वाढत असल्याने कांद्याच्या बाजारभावातील चढ-उतारामुळे उत्पादक शेतकरी चिंतेत असून आगामी काळात आवक आणि बाजारभावाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वाढीव रकमेचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

0
पुणे | प्रतिनिधी Pune राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे यापूर्वीच प्रस्ताव पाठवला असून, आता वाढीव रकमेचा प्रस्ताव पुन्हा पाठवण्यात येत असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय...