Thursday, November 19, 2026
Homeब्रेकिंग न्यूजशेतकऱ्यांच्या मदतीसाठी वाढीव रकमेचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वाढीव रकमेचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

पुणे | प्रतिनिधी Pune

- Advertisement -

राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे यापूर्वीच प्रस्ताव पाठवला असून, आता वाढीव रकमेचा प्रस्ताव पुन्हा पाठवण्यात येत असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गुरुवारी सांगितले.

या संदर्भात बोलताना भरणे म्हणाले, की केंद्राकडे किती मदत मागितली किंवा तिथून किती मदत मिळाली, यापेक्षा ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. ९५ लाख शेतकऱ्यांपैकी सुमारे १० लाख शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळायची आहे. काही शेतकऱ्यांना दिवाळीनंतर मदत मिळत आहे. उर्वरित शेतकऱ्यांपर्यंत रक्कम पोहोचवण्याचे काम सुरू आहे.

खरीप हंगाम वाया गेल्याने रब्बीसाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत दिली जाईल. एनडीआरएफच्या माध्यमातून तसेच ग्रामविकास आणि कृषी विभागांकडून मदत दिली जाईल. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ योजनेतून पाणी अडवण्याची कामे केली जातील. संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

ऊसदरावर तोडगा काढण्याचे आवाहन
ऊसदर आंदोलनावर बोलताना ते म्हणाले, कीं साखर कारखानदारांनी शेजारच्या जिल्ह्यांतील दरांचाही विचार करावा. जाहीर झालेल्या ३,५०० रुपयांच्या दरावर तोडगा काढण्याची गरज असून, कारखाने सुरू झाले आहेत आणि उसाचे गाळप सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

दुचाकीच्या डिक्कीतून रोख रक्कम लंपास

0
लासलगाव | वार्ताहर Lasalgon लासलगाव परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, चोरट्यांनी आता दुचाकीच्या डिक्कीलाही लक्ष्य केले आहे. लासलगाव स्थानक रस्त्यावरील महावीर मॉल येथे खरेदीसाठी...