Friday, November 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदादर रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून मुख्यमंत्र्यांचे घुमजाव; रेल्वे स्थानक नव्हे मेट्रो स्थानकाला 'चैत्यभूमी'...

दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून मुख्यमंत्र्यांचे घुमजाव; रेल्वे स्थानक नव्हे मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देणार

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या निर्णयावर प्रतिकूल प्रतिक्रिया उमटल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी या निर्णयावरून घुमजाव केले. दादर रेल्वे स्थानकाला नव्हे तर दादर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्यात येणार असल्याचा खुलासा मुख्यमंत्री कार्यलयाने आज केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर विधानभवनात बैठक घेतली होती. या बैठकीत दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्यास राज्य सरकारने यापूर्वीच तत्वतः मान्यता दिल्याची माहिती त्यांनी दिली होती. केंद्र सरकारकडून प्राप्त मार्गदर्शनानुसार विधानमंडळाच्या समितीशी संबंधित आवश्यक प्रक्रियेची पूर्तता विधिमंडळाच्या अधिवेशनात करून नामकरणाची कार्यवाही करण्यात येईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.

त्यामुळे दादर रेल्वे स्थानकाचे नामांतर चैत्यभूमी असे होणार असे गृहीत धरले जात होते. या निर्णयावरून राजकीय पक्ष आणि समाज माध्यमात जोरदार गदारोळ उडाला होता. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या निर्णयाला विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयाने आज एक्स या समाज माध्यमातून ट्विट करत दादर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देणार असल्याचा खुलासा करून वादावर पडदा टाकला आहे.

नामांतराची मागणी जुनीच
दरम्यान, दादर रेल्वे स्थानकाला चैत्यभूमी हे नाव देण्याची आंबेडकरी अनुयायांची मागणी जुनीच आहे. तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री रामविलास पासवान यांच्या कारकिर्दीत ही मागणी पहिल्यांदा पुढे आली होती. त्यानंतर सातत्याने महापरिनिर्वाण दिनाच्या आसपास दादर रेल्वे स्थानकाचे नामांतर चैत्यभूमी अशी करण्याची मागणी पुढे येते. मात्र, ही मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही.

ताज्या बातम्या

दुचाकीच्या डिक्कीतून रोख रक्कम लंपास

0
लासलगाव | वार्ताहर Lasalgon लासलगाव परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, चोरट्यांनी आता दुचाकीच्या डिक्कीलाही लक्ष्य केले आहे. लासलगाव स्थानक रस्त्यावरील महावीर मॉल येथे खरेदीसाठी...