नाशिक | प्रतिनिधी Nashik
दैनिक‘देशदूत’तर्फे नाशिक जिल्ह्यातील नागरी सहकारी बँका आणि पतसंस्थांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी शनिवारी (दि.२०) ‘सहकार दीपस्तंभ पुरस्कार-२०२६’ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला आणि त्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे हा या विशेष कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा माजी सहकार आयुक्त शैलेश कोतमिरे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले या मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत पार पडणार आहे. त्यांच्या हस्ते निवडक पतसंस्था आणि सहकारी बँकांना ‘सहकार दीपस्तंभ पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येईल. शनिवारी सायंकाळी ५ वाजता नासिलब, नाशिक-पुणे रोड येथे हा सोहळा पार पडेल.
विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर राहणार्या ‘देशदूत’ने आपली सामाजिक बांधिलकी पुढे चालू ठेवत या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. सहकार क्षेत्रातील संस्थांनी ग्रामीण व शहरी भागात केलेले आर्थिक व सामाजिक कार्य समाजासमोर आणणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.




