Sunday, October 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजतीन तासांपासून पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर काँग्रेसचे ठिय्या आंदोलन; राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या...

तीन तासांपासून पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर काँग्रेसचे ठिय्या आंदोलन; राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात

नवी दिल्ली |

- Advertisement -

नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून केंद्र सरकारविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर काँग्रेसचे ठिय्या आंदोलन तब्बल तीन तासांपासून सुरू आहे. आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पोलिसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना ताब्यात घेतले.

नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी काँग्रेसकडून गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी संसदेकडे मोर्चा काढण्यात आला. मोर्चादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केल्याने त्यानंतर देशभरात या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापले आहे.

दरम्यान, केंद्र सरकार नीट पेपरफुटी प्रकरणावर संसदेत चर्चा करण्यास तयार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली. राहुल गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी ही माहिती माध्यमांना दिली.  सरकार संसदेत चर्चेस तयार होतं, पण राहुल गांधींनी मागणी बदलली. मात्र, राहुल गांधी या विषयावर आडमुठी भूमिका घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

राहुल गांधी यांनी केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्यासमोर पाच प्रमुख मागण्या मांडल्या आहेत.

१)विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमार प्रकरणाबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत निवेदन करावे.
२)विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर संसदेत सविस्तर चर्चा घ्यावी.
३)केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तातडीने राजीनामा घ्यावा.
४)संसदेतील चर्चेदरम्यान संबंधित गृहसचिव उपस्थित राहावेत.
५)आंदोलकांवरील लाठीमाराची न्यायालयीन किंवा स्वतंत्र चौकशी करण्यात यावी.

ताज्या बातम्या

Accident News : तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात; ५...

0
बीड | Beed बीड जिल्ह्यातील (Beed District) माजलगाव तालुक्यात (Majalgaon Taluka) खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील शिंदेवाडी फाट्याजवळ आज (रविवारी) सकाळी ११ वाजेच्या सुमारास एक अत्यंत भीषण...