Friday, July 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : स्पेक्ट्रम इथर्स कंपनीत स्फोट; दोन जण जखमी

Nashik News : स्पेक्ट्रम इथर्स कंपनीत स्फोट; दोन जण जखमी

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

- Advertisement -


दिंडोरी तालुक्यातील रासेगाव येथील स्पेक्ट्रम इथर्स या रासायनिक कृषी कीटकनाशक उत्पादन करणार्‍या कंपनीमध्ये मंगळवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास केमिकल असलेले ड्रम प्रेशराईज होऊन फुटल्याने छोटा स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली. या घटनेत दोन कामगार भाजल्याने जखमी झाले असून त्यांना तातडीने वेदांता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

कृषी औषधे उत्पादक रासायनिक कंपनीत मोठ्या प्रमाणात कच्च्या मालाचे रासायनिक ड्रम असून त्यातील एक ड्रम चा दाब वाढल्याने तो फुटला आणि त्यानंतर आग लागली. मात्र कंपनीची अग्निशमन यंत्रणा, नगरपरिषद अग्निशमन दल तसेच प्रशासनाच्या तत्परतेमुळे अवघ्या 15 ते 20 मिनिटांत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार मुकेश कांबळे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, महसूल विभाग, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक, नगरपरिषद अग्निशमन दल व अन्य संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. आवश्यक सुरक्षा उपाययोजना राबवून आग विझविण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. ड्रम फुटल्याचा आवाज आणि कंपनीतून उठणारे धुराचे लोट पाहून कामगारांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली.

सर्व कामगारांनी तत्काळ सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. रासायनिक कंपनी असल्याने परिसरात विविध अफवा पसरून नागरिकांमध्येही काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्रशासनाने वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेचे मतदार यंदा निम्म्याने घटणार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रारूप मतदार यादी तयार करण्यासाठी सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे, बँकेच्या सभासद संस्थांचे 3 हजार...