Thursday, September 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजवंचित बहुजन आघाडीकडून २३ जुलैला महाराष्ट्र बंदची घोषणा

वंचित बहुजन आघाडीकडून २३ जुलैला महाराष्ट्र बंदची घोषणा

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

नीट परीक्षा पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत जंतर मंतरवर सुरु असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलीस लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ २३ जुलै महाराष्ट्र बंदची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केली.

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्यामुळे जनतेमध्ये मोठा संताप आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्हास्तरीय आणि प्रादेशिक संघटनांशी चर्चा करून २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात येत आहे. भाजपसोबत जाण्याची भूमिका नसलेल्या सर्व राजकीय पक्षांनी, सामाजिक संघटनांनी आणि नागरिकांनी या बंदला पाठिंबा द्यावा, असे आवाहन आंबेडकर यांनी यावेळी केले.

हा बंद पूर्णपणे शांततापूर्ण असेल. कोणत्याही प्रकारची हिंसा होऊ दिली जाणार नाही आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याने बंद शांततेत पार पाडला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

पडसाद : तुमचा होतो खेळ, शिक्षकांचा जातो जीव!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक तुमचा होतो खेळ, आमचा जातो जीव’ अशी एक उक्ती आपण अनेकदा ऐकत असतो. दोन बड्यांच्या वादात...