Friday, October 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूज२४ ऑक्टोबरला संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

२४ ऑक्टोबरला संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

नाशिक शहरातील प्रमुख जलवाहिन्यांची गळती बंद करणे, नवीन व्हॉल्व बसविणे आणि पाणी वितरण व्यवस्थेतील अत्यावश्यक दुरुस्तीची कामे करण्यासाठी येत्या शनिवारी (दि.24) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेतील महत्वाच्या जलवाहिन्यांवर अनेक ठिकाणी गळती आढळली आहे. तसेच काही ठिकाणी नवीन जोडण्या करणे, व्हॉल्व बसविणे आणि दूषित पाणीपुरवठ्याचे कारण शोधणे आवश्यक आहे. ही कामे एकाच वेळी हाती घेऊन पाणीपुरवठा यंत्रणा अधिक सुरळीत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. संबंधित कामे पूर्ण करण्यासाठी अंदाजे 12 त्ो 18 तास पाणीपुरवठा बंद ठेवणे आवश्यक असल्याचे मनपाने सांगितले आहे.
नाशिक पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक 30 मधील लेखानगर येथे सर्व्हिस रोडलगत असलेल्या 300 मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीची गळती बंद करण्यात येणार आहे.

कलानगर येथील जलकुंभाची वितरण वाहिनी अस्तित्वातील वितरण वाहिनीला जोडण्यात येईल. या दोन्ही कामांमुळे संबंधित भागातील पाणी वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्याचे नियोजन आहे. पश्चिम विभागात रामराज्य जलकुंभ येथील जलवाहिनीची गळती बंद केली जाणार आहे. त्र्यंबक रोडवरील पीटीसीच्या भिंतीलगत असलेल्या जलवाहिनीचीही दुरुस्ती करण्यात येईल. जीपीओ जलकुंभ येथे नवीन व्हॉल्व बसविणे आणि बी. डी. भालेकर मैदानाजवळील जलवाहिनीवर टी-जोडणी करणे, अशी कामेही हाती घेतली जाणार आहेत.

नाशिकरोड विभागात जलवाहिन्यांची गळती बंद करणे आणि दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यावर भर दिला जाणार आहे. पाटील गॅरेजमागे मंदिराजवळ शिरसाट यांच्या घरासमोर, महेशनगर येथे कलंत्री यांच्या घराजवळ तसेच हांडोरे मळा-वडनेर रोडलगत जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्यात येईल. रेजिमेंटल प्लाझासमोरील एचडीएफसी बँकेजवळ दूषित पाणीपुरवठ्याचे कारण शोधले जाणार आहे. वडनेर चौफुलीवरील देवळाली कॅम्प रोड परिसरात राठोड यांच्या घराजवळ आणि देवळाली गावातील मिस्त्री इंजिनिअरिंगजवळील विद्युत रोहित्राच्या परिसरात जलवाहिनीची गळती बंद केली जाईल.

मुक्तिधाम जलकुंभाखालील 300 मिमी व्हॉल्वची गळती बंद करून ग्रीसिंग करण्यात येणार आहे. देवळाली गावातील राजवाडा परिसरातील 300 मिमी व्हॉल्वचे ग्रीसिंग, विहितगाव जलकुंभाच्या आउटलेटवरील 300 मिमी व्हॉल्वची गळती बंद करणे आणि जय भवानी जलकुंभासमोरील जलवाहिनीची दुरुस्तीही केली जाणार आहे. पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक चारमध्ये कॅनॉलवरील म्हसरूळ-बोरगड उर्ध्ववाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक तीन मधील अमृतधाम चौफुली येथे मुख्य वितरण वाहिनीवर क्रॉस कनेक्शन केले जाईल.

शक्तीनगर परिसरातील नवीन उर्ध्ववाहिनीचे क्रॉस कनेक्शनही याच शटडाऊनदरम्यान करण्यात येणार आहे. सातपूर विभागात संत कबीरनगरमधील साईमंदिराजवळ आणि आनंदी आंगण जॉगिंग ट्रॅकजवळील प्रत्येकी 500 मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांची गळती बंद करण्यात येईल. सिरीन मिडोज परिसरात तिरुमाला ओंकार साईमंदिराजवळील 1200 मिमी व्यासाच्या मोठ्या जलवाहिनीची गळती दुरुस्त केली जाणार आहे.

नवीन नाशिक विभागातील प्रभाग क्रमांक 27 मधील पाथर्डी फाटा जलकुंभ क्रमांक चारच्या 800 मिमी व्यासाच्या व्हॉल्ववरील गळती बंद केली जाणार आहे. याच प्रभागातील अंबडगाव स्मशानभूमीजवळील 900 मिमी व्यासाच्या मुख्य पीएससी जलवाहिनीची गळती दुरुस्त करण्यात येईल.

नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन
शहरातील सहाही विभागांत नियोजित दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यासाठी शनिवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. रविवारी सकाळी पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याने काही भागांत नागरिकांना पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे शनिवारी आवश्यक त्ोवढा पाणीसाठा करून ठेवावा, पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि दुरुस्तीच्या कामांसाठी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाने केले आहे.

ताज्या बातम्या

रील स्टार निघाले लुटारू! ९ हजारांची रोकड, सोन्याचे दागिने आणि दुचाकी...

0
पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) सोशल मीडियावर रील बनवून प्रसिद्धी मिळविणारेच लुटारू निघाल्याचा धक्कादायक प्रकार पाथर्डी तालुक्यातील शेकटे फाट्याजवळ घडल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. पाथर्डी-कोरडगाव रस्त्यावर...