Friday, July 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूज'देशदूत’तर्फे आदर्श दाम्पत्यांना आज 'जीवनसाथी पुरस्कार'

‘देशदूत’तर्फे आदर्श दाम्पत्यांना आज ‘जीवनसाथी पुरस्कार’

नाशिक | प्रतिनिधी Nashik

संसाराचा गाडा समर्थपणे हाकत असताच समाजकारण, शिक्षण, उद्योग, कला, क्रीडा आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात आपल्या जोडीदाराच्या सोबतीने उत्तुंग भरारी घेणार्‍या आदर्श जोडप्यांचा गौरव करण्यासाठी शनिवारी (दि. २३) सायंकाळी ५ वाजता दैनिक ‘देशदूत’च्या वतीने ‘जीवनसाथी पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

हा सोहळा नाशिक-पुणे रोडवरील नंदिनी पुलाजवळ असलेल्या नासिलब येथे होणार आहे. या दिमाखदार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. सतीश गोगुलवार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शुभदा देशमुख, नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अभिजित आडके, शिक्षणतज्ज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते रतन लथ आणि प्रसिद्ध चित्रकार शर्वरी लथ हे उपस्थित राहणार आहेत.

ताज्या बातम्या

पडसाद : त्र्यंबकची माळीण होऊ द्यायची नसेल तर…

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक त्र्यंबकेश्वर आणि आजूबाजूचा परिसर गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि पूरपरिस्थितीचा सामना करीत आहे. अलीकडेच आलेल्या...