मुंबई / प्रतिनिधी Mumbai
- Advertisement -
सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदार म्हणून काम करणाऱ्या गजानन देवकते यांनी मंगळवारी आपली जीवनयात्रा संपवली. आर्थिक विपन्नावस्थेमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते.
मूळचे नांदेड जिल्ह्यातील असलेले देवकते हे गेल्या काही वर्षांपासून मुंबईत सार्वजनिक बांधकाम विभागात छोटी – मोठी कामे करत होते. मात्र, विभागाकडून केलेल्या कामाची देयके वेळेत मिळत नसल्याने ते आर्थिक अडचणीत होते. त्यातून मानसिक तणावाखाली येऊन त्यांनी नवी मुंबईतील आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.
देवकते यांच्या आत्महत्येमुळे बांधकाम विभागात काम करणाऱ्या ठेकेदारांच्या प्रलंबित देयकांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मध्यंतरी ठेकेदारांनी केलेल्या कामाची बिले मिळावीत यासाठी कामबंद आंदोलन केले होते.




