Thursday, May 2, 2024
Homeनगर26 जानेवारीला भुईकोट किल्ला, टँक म्युझीयम बंद राहणार

26 जानेवारीला भुईकोट किल्ला, टँक म्युझीयम बंद राहणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात विशेषत: अहमदनगर शहर (Ahmednagar City) व भिंगार कॅम्प (Bhingar Camp) हद्दीत करोना बाधितांची (Corona Positive) संख्या वाढत आहे. यामुळे दरवर्षी 26 जानेवारीला नागरिकांना पाहण्यासाठी खुले असलेला भुईकोट किल्ला (Bhuikot Fort) आणि टँक म्युझीयम (Tank Museum) यंदा बंद (Close) ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यामुळे 26 जानेवारीच्या दिवशी या दोन्ही ठिकाणी नागरिकांनी येऊ नये, असे आव्हान भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे (Bhingar Police Station) सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख (API Shishirkumar Deshmukh) यांनी केले आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात दररोज एक ते दीड हजार करोना बाधीत रूग्ण (Corona Positive Patient) आढळून येत आहे. अहमदनगर शहरात (Ahmednagar City) दररोज तीनशे ते पाचशे रूग्ण समोर येत आहे. वाढती रूग्णसंख्या धोक्याची असल्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. भुईकोट किल्ला (Bhuikot Fort) व टँक म्युझीयम (Tank Museum) पाहण्यासाठी खुले केल्यास त्याठिकाणी गर्दी होऊन करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भिती असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने यंदा दोन्ही ठिकाणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी 26 जानेवारी रोजी सर्व नागरिकांना पाहण्यासाठी भुईकोट किल्ला आणि टँक म्युझीयम खुले करण्यात येते मात्र यंदा ते बंद असल्याने नागरिकांची निराशा झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या