Thursday, October 22, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज्यात २७ सप्टेंबर पासून सहा दिवस जोरदार पावसाची शक्यता

राज्यात २७ सप्टेंबर पासून सहा दिवस जोरदार पावसाची शक्यता

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

राज्यात शनिवार (दि.२७) पासुन दसऱ्या पर्यंतच्या ६ दिवसात महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यात शनिवार दि.२७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर   दरम्यान हलका ते मध्यम  स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.शनिवारी घाट क्षेत्रात व जिल्ह्याच्या एक-दोन ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला असून मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

रविवार व सोमवारी जिल्ह्याच्या एक-दोन ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार  ते अति मुसळधार पाऊस, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.असा अंदाज महात्मा फुले कृषी विद्यापिठाचे   विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी यांनी वर्तविला आहे.

दसऱ्यापर्यंत जोरदार पाऊस
 मध्य व वायव्य बंगाल उपसागरादरम्यान झालेल्या हवेच्या कमी दाबामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शनिवार (दि. २७) पासुन दसऱ्यापर्यंतच्या ६ दिवसात  संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यात उद्या अतिजोरदार पाऊस मुंबई, ठाणे, रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा व धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यात होणार आहे.

रविवार (दि. २८) पासून मंगळवार दि.३० पर्यंत नाशिक, मुंबई,पालघर, ठाणे, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग  छ. सं. नगर व पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा भागात पाऊस होणार आहे, असे ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. शुक्रवार दि. ३ ऑक्टोबर पासुन पूर्णतः नव्हे परंतु काहीशी उघडीपीची शक्यता जाणवते, असेही  खुळे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 12 जागांसाठी उमेदवार जिल्हा बँकेच्या आखाड्यात; कोण कोण झाले...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 संचालक मंडळाच्या जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत बुधवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी निवडणूूक बिनविरोधचा फुसका बार फुसका ठरला....