त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी Trimbakeshwar
वारकर्यांचे माहेर म्हणजे पंढरपूरला साक्षात पांडुरंगाला भेटण्यासाठी संत निविृत्तनाथ महाराज पालखीचे उद्या दि.२९ जून रोजी त्र्यंबकेश्वर येथून दूपारी दोन वाजता प्रस्थान होणार आहे. यात सुमारे ५६ दिंड्या आणि १५ हजार वारकरी सहभागी होणार आहे. येथून आषाढवारीसाठी संत निवृत्तिनाथांची पालखी चांदीचा रथ पायी दिंडी प्रस्थान २९ जून सोमवार रोजी दुपारी ठीक दोन वाजता श्री संत निविृत्तनाथ महाराज मंदिर येथून सुरुवात होईल अशी माहिती श्री संत निवृत्तिनाथ महाराज संस्थान ट्रस्ट मंडळाकडून देण्यात आली.
सिंहस्थ कामांमुळे रस्त्याच्या कामामुळे यावर्षी संत निवृत्तिनाथ महाराज पालखी संत निवृत्तिनाथ महाराज मंदिर हनुमान मंदिर चौकी माथा सुंदराबाई मठ, या मार्गावरून सरळ तसेच खाली कदम मार्गाकडे वळेल भगवती चौकात रथ थांबेल संत निवृत्तिनाथांची पालखी नेत दिंडी तीर्थराज कुशावर्त येथे जाईल या ठिकाणी देवाला स्नान घालण्यात येईल. रथात पालखी ठेवून पालखी मार्गस्थ होईल पालखीत निवृत्तिनाथांची चांदीची मूर्ती आणि पादुका असतात.
भगवती चौक बोहर पट्टी त्रंबकेश्वर मंदिर मार्गे श्री संत गजानन महाराज संस्थान, त्र्यंबकेश्वर मुख्य नाका येथे जाईल. नागरिक या मुख्य नाया पर्यंत जाऊन पालखीला निरोप देतील. खरे तर ७०० सातशे वर्षापासून पालखी दिंडी सोहळा सुरू झालेले आहे परंतु कागदपत्रावर जवळपास अडीचशे वर्षांपासून दिंडी सोहळा आहे त्यामुळे त्र्यंबक नगरी अंतर्गत २५०वर्षात प्रथमच पालखीचा मार्ग बदलला आहे.
नाशिक जिल्ह्यातील लहान मोठ्या जवळपास २३ दिंड्या संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीत सामील होतात. व सिन्नर भाग नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी संत निवृत्तिनाथ यांच्या दिंडीत सामील झाल्याने संख्या ५६ च्या पुढे पोहोचते. तर भाविकांची संख्या ४० हजारापर्यंत वारकरी दिंडीत सामील होतात. वाटेत छोट्या-मोठ्या अनेक दिंड्या सामील होतात. पालखीचे परंपरेने कुशावर्त तीर्थावर स्वागत गाव पातळीवर नगरपालिकेकडून केले जाते अशी प्रथा आहे यानुसार नगराध्यक्ष व नगरसेवक पालखीचे कुशावर्तवर स्वागत करतील या ठिकाणी देवास स्नान अभिषेक केला जाईल.
पालखीचा पहिला मुक्काम त्र्यंबकेश्वर लगत प्रयाग तीर्थ समोरील श्री पंचायती महानिर्वाणी आखाड्यात आहे. संत निवृत्तिनाथांच्या पालखी आणि रथाला सजावट करण्यात आली आहे. थेट पंढरपूर पर्यंत त्या त्या जिल्ह्यातील पोलिसांकडून पालखीला विशेष संरक्षण दिले जाणार आहे. श्री संत निवृत्तिनाथ महाराज संस्थान नगरपालिका त्र्यंंबकेश्वर तहसील जिल्हाधिकारी स्थानिक पोलीस स्टेशन ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत यापूर्वी पालखी सोहळ्यासाठी बैठका होऊन देण्यात तयारी झालेली आहे.




