राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोमवारी सोयाबीनची (Soybean) 12 क्विंटल आवक होऊन त्याला सरासरी 7,696 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. गव्हाची 2 क्विंटल आवक झाली असून, गव्हाला सरासरी 3,000 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सोमवारी डाळिंबाच्या (Pomegranate) 2,243 क्रेट्सची आवक झाली. त्यामध्ये डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 131 ते 175 रुपये, नंबर 2 ला 91 ते 130 रुपये, नंबर 3 ला 41 ते 90 रुपये, तर नंबर 4 ला 10 ते 40 रुपये प्रतिकिलो असा भाव मिळाला.
याशिवाय, संत्र्यांच्या 67 क्रेट्सची आवक होऊन संत्र्याला 5 ते 32 रुपये (सरासरी 25 रुपये) प्रतिकिलो भाव मिळाला. सीताफळाच्या 43 क्रेट्सची आवक झाली असून, त्याला 15 ते 82 रुपये (सरासरी 60 रुपये) प्रतिकिलो दर मिळाला. तसेच, पेरूच्या (Guava) 49 क्रेट्सची आवक होऊन पेरूला 10 ते 30 रुपये (सरासरी 25 रुपये) प्रतिकिलो भाव मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.




