Monday, November 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूज'गोकुळ'च्या अध्यादेशासाठी मोजले ८० लाख! राज्य सरकारकडून ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांना...

‘गोकुळ’च्या अध्यादेशासाठी मोजले ८० लाख! राज्य सरकारकडून ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांना देयक अदा

मुंबई | प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात ‘गोकुळ’ वर पाच शासकीय संचालक नियुक्त करणाऱ्या अध्यादेशाच्या न्यायालयीन युक्तिवादासाठी राज्य सरकारने न्यायालयात तब्बल ८० लाख रुपये मोजले आहेत. न्यायालयात सरकारच्या वतीने बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांचे ८० लाख रुपयांचे शुल्क अदा करण्याबाबत सहकार विभागाने सोमवारी शासन निर्णय जारी केला.

गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर अध्यक्षपदासाठी गणपूर्तीचा पेच निर्माण झाला होता. या तांत्रिक मुद्द्याच्या आधारे गोकुळची सत्ता ताब्यात घेण्यासाठी सरकारने वार्षिक ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांवर एक शासकीय आणि चार अशासकीय असे पाच तज्ज्ञ संचालक नेमण्याचा निर्णय घेतला. पाचपैकी चार संचालकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. त्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम ७३ अअअ (२) मध्ये दुरुस्ती करून अध्यादेश काढण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता.

- Advertisement -

मनोज जरांगे पुन्हा मैदानात; महाराष्ट्र दौरा करणार, ‘या’ तारखेपासून राज्यव्यापी दौऱ्याला सुरवात

सहकार कायद्यातील सुधारणा करणारा अध्यादेश ६ नोव्हेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आला. त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये रिट याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. गोकुळच्या २५ संचालकांपैकी १३ संचालक समविचारी आघाडीचे आहेत. या आघाडीच्या वतीने शशिकांत आनंदाराव पाटील-चुयेकर आणि इतरांनी रिट याचिका दाखल करून शासनाच्या अध्यादेशाला आव्हान दिले होते.

या प्रकरणात राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. मुकुल रोहतगी यांची नियुक्ती करण्यात आली होती. रोहतगी यांना एका दिवसाच्या युक्तिवादासाठी तब्बल ८० लाख रुपये शुल्क देण्यात आले. यापैकी आठ लाख रुपये आयकर कपात करून उर्वरित ७२ लाख रुपये वितरित करण्यास सहकार विभागाने आज मान्यता दिली. न्यायालयीन लढाईसाठी झालेल्या ८० लाख रुपयांच्या खर्चाला सरकारने मंजुरी दिल्याने हा निर्णय चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

Soybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोमवारी सोयाबीनची (Soybean) 12 क्विंटल आवक होऊन त्याला सरासरी 7,696 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. गव्हाची...