Thursday, October 22, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज्य सरकारकडून व्ही. शांताराम आणि राज कपूर जीवन गौरव पुरस्कार जाहीर

राज्य सरकारकडून व्ही. शांताराम आणि राज कपूर जीवन गौरव पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, प्रसाद ओक, सलीम खान आणि राणी मुखर्जी यांचा समावेश

- Advertisement -

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने आज (२९ जुलै) प्रतिष्ठेचे व्ही. शांताराम आणि राज कपूर पुरस्कार जाहीर केले. चित्रपटसृष्टीतील अभिनय, संगीत, दिग्दर्शन आणि लेखन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा या पुरस्कारांद्वारे सन्मान करण्यात येणार आहे.

यंदाचा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांना जाहीर झाला आहे. मराठी व हिंदी चित्रपटसंगीत, भक्तीगीत, भावगीत आणि शास्त्रीय संगीत क्षेत्रातील त्यांच्या दीर्घकालीन योगदानाची दखल घेत हा सन्मान देण्यात आला आहे.

अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता प्रसाद ओक यांना व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठी चित्रपट, नाटक आणि दूरदर्शन क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव या पुरस्कारातून करण्यात येणार आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ पटकथालेखक सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार, तर अभिनेत्री राणी मुखर्जी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या दीर्घकालीन आणि प्रभावी योगदानाचा सन्मान म्हणून हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

दरवर्षी महाराष्ट्र शासनातर्फे चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना हे प्रतिष्ठेचे पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

ताज्या बातम्या

पडसाद : दादा, जरा शिक्षण खात्याकडेही लक्ष द्या!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे संपूर्ण राज्यभर नाशिकच्या शिक्षण विभागाच्या कारनाम्यांची लक्तरे वेशीवर टांगली जात असतांनाही हे खाते...