
नाशिक | प्रतिनिधी Nashik
नाशिकमधील नागरिकांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी दैनिक ‘देशदूत’च्या वतीने आयोजित ‘पंचवटी अॅनेक्स प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ चे शुक्रवारी सायंकाळी अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार सोहळ्यात उदघाटन झाले. पंचवटी येथील जत्रा चौफुली, नांदूर-लिंक रोडवरील रामलिला बँक्वेट हॉलमध्ये हे प्रदर्शन ३१ मे पर्यंत भरवण्यात आले आहे.
उद्घाटन आमदार राहुल ढिकले, प्रभाग क्रमांक २ च्या नगरसेविका ऐश्वर्या लाड जेजुरकर, जयवंत जेजुरकर आणि आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या भाषणातून प्रदर्शनाचा उद्देश आणि ग्राहकांसाठी उपलब्ध असलेल्या संधींची माहिती दिली. संपादक शैलेंद्र तनपुरे यांनी प्रदर्शनाची भूमिका मांडताना, ‘देशदूत’ने नेहमीच नाशिककरांच्या विश्वासाला प्राधान्य दिले असून, एकाच छताखाली घरांचे विविध पर्याय उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले.
‘स्वप्न तुमचे, शोध आमचा’ हे ब्रीदवाक्य असलेल्या या प्रदर्शनात नाशिकमधील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे बजेट होम्सपासून लक्झरी विला आणि कमर्शियल शॉप्सपर्यंतचे अनेक प्रकल्प मांडण्यात आले आहेत. प्रदर्शन रविवारपर्यंत दुपारी २ ते रात्री ९ या वेळेत सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुले राहणार असून, नाशिककरांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे पर्यावरणीय पार्टनर पापायज नर्सरी आहेत. सूत्रसंचालन उपसंपादक (जाहिरात) ज्ञानेश्वर जाधव यांनी केले. प्रदर्शन यशस्वीतेसाठी मार्केटिंग ऑफिसर भगवंत जाधव, आनंद कदम, समीर पाराशारे, प्रशांत अहिरे, विशाल जमधडे आदी प्रयत्नशील आहेत.
सहभागी बांधकाम व्यावसायिक
पार्कसाईड, ललित रुंगटा ग्रुप, दक्ष रियल्टी, स्कीया प्रॉपर्टीज, सीडीआयएल, ललवाणी ग्रुप, जय डेव्हलपर्स, एलिका ग्रुप, आरसीपीएल, शेठ रियल्टी, सुमित बिल्डकॉन, सचिन पी. बागड, एस अँड एस डेव्हलपर्स, ट्रिनिटी रियल्टर्स, ए. आर. डेव्हलपर्स, नंदन, ओंकारंश्वर इन्फ्राटेक, अर्थलँड डेव्हलपर्स आणि विजा प्रॉपर्टीज्
आमदार राहुल ढिकले यांचे कडून ‘देशदूत’चे कौतुक
पंचवटी परिसर, विशेषतः जत्रा चौफुली आणि नांदूर रोड हा नाशिकमधील सर्वाधिक वेगाने विकसित होणारा भाग आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार येथील नागरिकांना रस्ते, पाणी आणि नागरी सुविधा पुरवण्यावर आमचा भर आहे. सिंहस्थाच्या निमित्ताने या भागात अनेक विकासकामे प्रस्तावित आहेत. दिंडोरी रोडवर २७ एकर जागेवर मेडिकल कॉलेज आणि महसूल भवन उभे राहत असून त्याला शासनाचे पूर्ण सहकार्य लाभत आहे. ‘देशदूत’ने या परिसरात असे प्रदर्शन आयोजित करून ग्राहकांना एकाच ठिकाणी घराचे अनेक पर्याय दिले आहेत, हे कौतुकास्पद आहे.
-आमदार राहुल ढिकले
प्रदर्शन फायदेशीर ठरेल.
देशदूत समूहाने पंचवटी अॅनेक्स भागाची वाढती व्याप्ती लक्षात घेऊन हा प्रॉपर्टी एक्स्पो आयोजित केला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. या परिसरात घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी हे प्रदर्शन अत्यंत फायदेशीर ठरेल. अनेक नामांकित बिल्डर्सचे प्रकल्प येथे एकाच छताखाली पाहायला मिळत असल्याने सामान्य नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत. नागरिकांनी या सुवर्णसंधीचा नक्कीच लाभ घ्यावा.
-नगरसेविका ऐश्वर्या लाड-जेजुरकर



































