Monday, July 27, 2026
HomeनाशिकNashik Accident News : अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू

Nashik Accident News : अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik

नाशिक-पुणे महामार्गावर (Nashik-Pune Highway) असलेल्या हॉटेल कामत समोर रविवारी (दि.१४) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने. या अपघातात (Accident) दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या महिलेचा मृत्यू (Death) तर चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

- Advertisement -

या अपघातात सुनंदा गणेश ढाके (वय ५८, रा. श्रीनिवास कोर्ट, आर्टिलरी सेंटर रोड, नाशिकरोड) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर त्यांचे पती गणेश मुरलीधर ढाके (वय ६३) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नाशिकरोड येथील रहिवासी गणेश ढाके हे रविवारी पत्नी (Wife) सुनंदा यांच्यासह मोटारसायकलने (एमएच१५ एफएल ८०२८) द्वारकाकडून नाशिकरोडकडे येत होते. त्यांची दुचाकी कामत हॉटेलसमोर आली असता, पाठीमागून आलेल्या एका अज्ञात चारचाकी वाहनाच्या चालकाने ढाके यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे, ढाके दाम्पत्य रस्त्यावर फेकले गेले.

यात दुचाकीच्या (Two-Wheelers) मागील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.अपघात घडल्यानंतर संशयित वाहनचालक गाडीसह फरार झाला. त्याच वेळी तिथून जाणाऱ्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचारी भोसले आणि त्यांच्या मित्राने तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमींना हॉस्पिटलमध्ये केले. उपचारादरम्यान सुनंदा ढाके यांची प्राणज्योत मालवली. तर गणेश ढाके यांच्या डोक्याला आणि मानेला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी मृत सुनंदा ढाके यांची मुलगी छाया लोमेश भोगे (वय ३४) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : २७ जुलै २०२६ – यश शिरावर घेताना,विवेक पायाशी हवा

0
जंतरमंतरच्या ऐतिहासिक मैदानावर नुकताच घडलेला घटनाक्रम भारताच्या तरुणाईच्या अफाट ताकदीची आणि संघटित ऊर्जेची साक्ष देणारा ठरला. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या ‘जेन झी’ पिढीचे प्रतिनिधित्व...