Monday, October 26, 2026
HomeनाशिकNashik News : नाशिक शहर कार्यक्षेत्रात 'या' तारखेपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

Nashik News : नाशिक शहर कार्यक्षेत्रात ‘या’ तारखेपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

नाशिक | Nashik

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये नाशिक शहर कार्यक्षेत्रात 26 सप्टेंबर,2026 रोजी मध्य रात्रीपासून ते 10 ऑक्टोबर, 2026 रोजी रात्री 24.00 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केला आहे.

- Advertisement -

सदरचे आदेश लग्नकार्य, धार्मिक विधी, प्रेतयात्रा, चित्रपटगृह आदींसाठी लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही.

या आदेशाचे (Order) उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 135 अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही पोलीस आयुक्त श्री. कर्णिक यांनी आदेशात नमूद केले आहे.

ताज्या बातम्या

Eknath Shinde : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत वेळेत मिळावी, सर्व यंत्रणांनी सतर्क...

0
नाशिक | Nashik राज्यातील दुष्काळी (Drought) परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना (Farmer) तातडीने दिलासा देण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयांची प्रभावी आणि कालबद्ध अंमलबजावणी करावी. पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा,...