यावल – प्रतिनिधी
यावल शेत शिवारातील आणि जुन्या अट्रावल रस्त्याकडील गट नंबर 601 मध्ये या गटात 3000 केळीचे घर अर्धवट छाटून अज्ञात इसमाने साडेचार लाख रुपये किमतीचे शेतकऱ्यांची नुकसान केल्याप्रकरणी यावल पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अट्रावल येथील रहिवासी केशव गोवर्धन चौधरी यांचे यावल शेत शिवारात गटनंबर 601 मध्ये केळीच्या रोपांची लागवड 5800 खोडांची लागवड करण्यात आलेली होती. त्यावर पहिला बहार त्यांनी घेतलेला होता नंतर पिल बाग हा ठेवलेला होता केल्या पंधरा दिवसांपूर्वी 270 केळीची तोड (काटन) करण्यात आलेली होती आता दोन-तीन दिवसांमध्येच केळीची काटन होणार होती त्यात अज्ञात व्यक्तीने 4 जानेवारी 25 रोजी रात्रीच्या सुमारास किंवा पाच जानेवारी पहाटेच्या सुमारास 3000 केळीचे झाड अर्धवट छाटून सुमारे साडेचार लाख रुपये किमतीचे नुकसान केले. केशव गोवर्धन चौधरी हे नेहमीप्रमाणे पहाटे साडेसात वाजता रविवारी शेतात केळीची पाहणी करण्यासाठी गेले होते तेव्हा सदरच्या प्रकार उघडकीस आला.
त्यांनी घरी त्यांच्या पत्नी तेजश्री यांना फोनवरून सदरची घटना घडवली आणि केशव चौधरी यांचे मित्र परेश रवींद्र चौधरी गोकुळ हरिश्चंद्र चौधरी समाधान प्रभाकर गजरे दिनेश नितीन महाजन परेश सुधाकर महाजन यांना सदरची घटना सांगितली असता त्यांच्यासह गावकऱ्यांनी केशव चौधरी यांचे यावल शिवारातील गट नंबर 601 गाठले व झालेल्या नुकसानी बद्दल पाहणी केली व शेतकरी यांना धीर दिला.
सदर घटनेबाबत आ.अमोल हरिभाऊ जावळे यांना भ्रमणध्वनीवरून कळविण्यात आले त्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पाहणी केली त्यांच्यासोबत कृषी भूषण नारायण बापू चौधरी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नितीन व्यंकट चौधरी व शेतकरी उपस्थित होतेआणि यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर तसेच जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या ठाणे सदरच्या घटनेबाबत अवगत केले शेतकऱ्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा तर दाखल झालाच मात्र या परिसरात या रस्त्यावरच अशा या एक महिन्याच्या अंतरावर घटना घडत असून नेमके अशा घटना घडणारे व घडविणारे कोण? याबद्दल आता संशय निर्माण होत आहे.
सदर घटनेबाबत यावल पोलीस स्टेशनला नुकसानी संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोडे हे पुढील तपास करीत आहेत
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंनी घेतली दखल
रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री नामदार रक्षाताई खडसे यांना सदरची माहिती कळविण्यात आली त्यांनी या संदर्भात विशेष लक्ष घालून जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करून सदर घटनांना आळा कसा घालता येईल आणि याला कायमस्वरूपी ब्रेक कसा बसेल यासाठी स्वतंत्र यंत्र उभी करण्यासंदर्भात त्यांनी संबंधितांची चर्चा केली असून नजीकच्या कालखंडात याला कायम स्वरूपी उपाय हवा अशी उपाय योजना करण्याचे सूचनाही त्यांनी दिल्या.