Wednesday, June 10, 2026
Homeक्रीडाWomens T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाची...

Womens T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा; कुणाला संधी, कुणाचा पत्ता कट

मुंबई | Mumbai

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर मात करून ऐतिहासिक कामगिरी बजावल्यानंतर आता भारतीय महिला क्रिकेट संघाचे लक्ष टी-२० विश्वचषकावर (Womens T20 World Cup 2026 ) केंद्रित झाले आहे. जून-जुलै महिन्यात इंग्लंड आणि वेल्समध्ये रंगणाऱ्या आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी आज (दि.०२) रोजी मुंबईतील बीसीसीआय (BCCI) मुख्यालयात भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.

- Advertisement -

या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद हरमनप्रीत कौरकडे (Harmanpreet Kaur) असणार आहे. तर स्मृती मंधानाकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. यात नंदिनी शर्माला पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. तर काशवी गौतम, अनुष्का शर्मा,उमा छेत्रीला वगळण्यात आले आहे. तसेच राधा यादव, यास्तीका भाटियाचे संघात पुनरागमन झाले आहे.

‘अ’ गटात भारतासमोर तगडे आव्हान

या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा समावेश ‘अ’ गटात करण्यात आला आहे. या गटात भारतासमोर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघांचे मोठे आव्हान असेल.

भारताचा गट (Group A) : भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि नेदरलँड्स.

नजरा मोठ्या सामन्यांवर

या स्पर्धेत भारताला केवळ पाकिस्तानविरुद्धचा हाय-व्होल्टेज सामनाच जिंकायचा नाही, तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेला नमवून विजेतेपदाकडे कूच करायची आहे. आज जाहीर होणारा संघ या आव्हानांना पेलण्यासाठी किती सक्षम असेल, याकडे सर्व क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

स्पर्धेचे वेळापत्रक आणि महत्त्व

  • कालावधी : १२ जून ते ५ जुलै.
  • यजमान : इंग्लंड आणि वेल्स.
  • हंगाम : हा टी-२० विश्वचषकाचा १० वा हंगाम आहे.

विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार) स्मृती मंधाना, जेमिमा रॉडरीक्स, दीप्ती शर्मा,रिचा घोष, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, रेणुका सिंग ठाकूर,भारती फुलमाली, नंदिनी शर्मा, राधा यादव, श्रेयांका पाटील

ताज्या बातम्या

संपादकीय : १० जुन २०२६ – मोदींची तपपूर्ती अन् ‘इंडिया’ची वज्रमूठ

0
भारतीय लोकशाही आज एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. एकीकडे सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) सलग तिसर्‍यांदा सत्ता स्थापन करून सुमारे...