Thursday, September 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजHSC Result 2026 : नाशिक विभागाचा बारावीचा निकाल ९०.७२ टक्के; मुलींची बाजी, विज्ञान...

HSC Result 2026 : नाशिक विभागाचा बारावीचा निकाल ९०.७२ टक्के; मुलींची बाजी, विज्ञान शाखेचा दबदबा

राज्यात सातव्या स्थानावर

नाशिक | Nashik

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज (शनिवारी) दुपारी १ वाजता बारावीचा निकाल (HSC Result) ऑनलाइन जाहीर केला. यात नाशिक विभागात (Nashik Division) यंदाही मुलींनीच बाजी मारली असून, विभागाचा एकूण निकाल ९०.७२ टक्के लागला आहे. मात्र, राज्याच्या क्रमवारीत नाशिक विभाग यंदा सातव्या स्थानी घसरला आहे.

मुलींचे वर्चस्व कायम

यंदाही निकालात मुलींनी (Girls) मुलांवर मात केली आहे. नाशिक जिल्ह्यात ९५.८१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या, तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९१.३४ टक्के इतके आहे. जिल्ह्यातील एकूण ७६,७४८ विद्यार्थ्यांपैकी ७१,७२० विद्यार्थी बारावीची परीक्षा पास झाले आहेत. तर विभागात एकूण १५,०१३ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असून त्यात नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक ५,०२८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

हे देखील वाचा : Maharashtra Board HSC Result 2026 : आज बारावीचा निकाल; ‘या’ अधिकृत लिंकवर बघता येणार रिझल्ट

शाखा आणि विषयानुसार कामगिरी

शाखानिहाय निकालात (Result) विज्ञान शाखेने ९८.६३ टक्के निकालासह आघाडी घेतली आहे. तर ९१.८९ टक्क्यांसह वाणिज्य शाखा दुसऱ्या आणि ८४.८२ टक्क्यांसह कला शाखा तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर विषयांचा विचार केल्यास संस्कृत विषयाचा निकाल सर्वाधिक ९९.७८ टक्के लागला आहे. त्यापाठोपाठ रसायनशास्त्र (९९.१३%), जीवशास्त्र (९९.२०%), गणित (९८.९५%) आणि भौतिकशास्त्र (९८.९२%) विषयांत विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली.

कोणत्या तालुक्याचा निकाल सर्वाधिक

नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) त्र्यंबकेश्वर आणि येवला तालुक्यांनी ९७.६०% निकालासह संयुक्तपणे बाजी मारली आहे. सिन्नर तालुका ९६.८६ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी आहे. मात्र, इगतपुरी तालुक्याचा निकाल सर्वात कमी म्हणजे ७२.९१% लागला आहे.

हे देखील वाचा : Maharashtra Board HSC Result 2026 : गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा बारावीच्या निकालाची टक्केवारी कमी; कुठल्या विभागाचा सर्वाधिक?

विभागातील जिल्ह्यांची स्थिती

नाशिक विभागातून १ लाख ६१ हजार ८१२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १ लाख ४६ हजार ७९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्यानुसार निकालाची टक्केवारी खालीलप्रमाणे आहे.

  • नंदुरबार : ९४.६६% (विभागात प्रथम)
  • नाशिक : ९३.४४% (द्वितीय)
  • धुळे : ८९.६७% (तृतीय)
  • जळगाव : ८५.०८% (चतुर्थ)

ताज्या बातम्या

Belapur : चंपत राय यांच्या जागी बेलापूरचे भूमिपूत्र

0
बेलापूर |वार्ताहर| Belapur येथील भूमिपुत्र राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरी यांची अयोध्या येथील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या महासचिवपदी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. काल अयोध्या येथे श्रीराम मंदिर...