Tuesday, September 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजआज रंगणार ‘देशदूत शिलेदार पुरस्कार’ सोहळा

आज रंगणार ‘देशदूत शिलेदार पुरस्कार’ सोहळा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

समाजाच्या विविध स्तरांतील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिक ‘देशदूत’च्या वतीने यंदा प्रथमच ‘देशदूत शिलेदार पुरस्कार २०२६’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्राची अस्मिता आणि पराक्रमाचा इतिहास आपल्या अभिनयाने घराघरांत पोहोचवणारे सुप्रसिद्ध सिने-अभिनेते अजय पुरकर हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, त्यांच्याच हस्ते या सर्व पुरस्कारप्राप्त ‘शिलेदारांना’ सन्मानित केले जाणार आहे. तसेच हा सोहळा नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. शुक्रवार, दि.३१ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता नाशिक-पुणे रोडवरील नंदिनी पुलाजवळ असलेल्या नासिक्ल्ब येथे कार्यक्रम होणार होणार आहे.

ऐतिहासिक परंपरेचा वारसा जपत आजच्या आधुनिक युगातही समाजसेवेची मशाल धगधगती ठेवणार्‍या खर्‍याखुर्‍या नायकांचा सन्मान करणे या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पुरस्कार सोहळ्यास प्रायोजक म्हणून ‘दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स’ हे लाभले आहेत.

ज्याप्रमाणे स्वराज्य निर्मितीमध्ये प्राणाची बाजी लावून अहोरात्र झटणार्‍या मावळ्यांना शिलेदार म्हणून गौरविले जात असे, त्याच धर्तीवर आजच्या कठीण परिस्थितीतही स्वत:सह समाजाच्याही प्रगतीसाठी आणि कल्याणासाठी धडपडणार्‍या परिसरातील अनमोल हिर्‍यांची दखल या उपक्रमातून घेण्यात आली आहे. हजारो लोकांपर्यंत या कर्तृत्ववान व्यक्तींचे कार्य पोहोचवण्यासाठी आणि त्यांच्या निस्वार्थ सेवेला दाद देण्यासाठी सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

तुकाराम

FDAच्या कथित ‘रेट कार्ड’वरून वाद; संजय राऊतांच्या आरोपांना तुकाराम मुंढेंचं प्रत्युत्तर,...

0
मुंबई | Mumbaiअन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कारभारावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत आणि FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले...