Wednesday, September 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; नदी-नाल्यांना पूर

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; नदी-नाल्यांना पूर

- Advertisement -

सुरगाणा | प्रतिनिधी Surgana

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, तालुक्यातील अनेक भागात नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. पावसामुळे ग्रामीण भागातील जणजीवन विस्कळीत झाले असून, अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

तालुक्यातील डोंगराळ आणि दुर्गम भागात पावसाचा जोर अधिक असल्याने ओढे, नाले तसेच लहान-मोठ्या नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. काही ठिकाणी रस्त्यांवरून पाणी वाहत असल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. मुसळधार पावसामुळे आधीच खराब झालेल्या ग्रामीण रस्त्यांची अवस्था आणखी बिकट झाली असून, अनेक मार्गांवर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

भात लागवडीसह विविध पिकांच्या लागवडीची कामे सुरू असून, शेतकरी पावसाचा फायदा घेत शेतकामात व्यस्त आहेत. मात्र, पावसाचा जोर कायम राहिल्यास काही भागातील पिकांचे नुकसान होण्याची भीतीही शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : आदिवासी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ घेणार राहुल गांधींची भेट; मंत्री...

0
नाशिक | Nashik गेल्या १५ दिवसांपासून शहरातील ईदगाह मैदानावर विविध प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन (Protest) सुरू आहे. दहा ते बारा दिवसांपासून तीन विद्यार्थी (Student)...