Saturday, July 4, 2026
HomeUncategorizedजळगाव : जिल्ह्यात आढळले आणखी ४ पॉझिटिव्ह रुग्ण

जळगाव : जिल्ह्यात आढळले आणखी ४ पॉझिटिव्ह रुग्ण

जळगाव  – 

जिल्ह्यातील स्वॅब घेतलेल्या ४३ कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल बुधवारी प्राप्त झाले आहे. यापैकी ३९ व्यक्तीचे   अहवाल निगेटिव्ह आले असून चार व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

- Advertisement -

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये भुसावळ येथील ५९ वर्षीय पुरुष, अडावद (ता. चोपडा) येथील ५८ वर्षीय पुरुष, जळगावातील नेहरुनगरातील ७५ वर्षीय पुरुष, तर अमळनेर येथील ३६ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ६६ इतकी झाली असून त्यापैकी तेरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तर मेहरुण आणि त्यानंतर मुंगसे (ता.अमळनेर) येथील दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मुंगसेतील कोरोना मुक्त झालेल्या ६० वर्षीय महिलेस बुधवारी दुपारी घरी सोडण्यात आले, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...