Saturday, October 3, 2026
Homeक्राईमNashik Crime News: इगतपुरी येथील समृद्धी महामार्गालगत ६९ लाख ३३ हजार रुपयांच्या...

Nashik Crime News: इगतपुरी येथील समृद्धी महामार्गालगत ६९ लाख ३३ हजार रुपयांच्या गुटखा साठ्यासह कंटेनर जप्त

इगतपुरी । प्रतिनिधी
तालुक्यातील पिंप्रीसदो फाट्याजवळील समृद्धी महामार्गाचा वापर करून राज्यात व बाहेर अन्य जिल्ह्यांत होणारी राज्यातील प्रतिबंधित सुगंधी तंबाखु, गुटखा तस्करी होत असतांना इगतपुरी पोलीस आणि अन्न प्रशासन यंत्रणा यांनी सापळा रचुन सुमारे ६९ लाख ३३ हजार रुपयांचा गुटखा, सुगंधीत तंबाखुसह वाहतुक करणारे कंटेनर जप्त करून ३ जनांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक सारीका अहिरराव यांना प्रतिबंधीत गुटख्याची वाहतुक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या आधारे त्यांनी अन्न प्रशासन विभागाच्या पथकासह पोलीस पथकाने सापळा रचुन पिंप्रीसदो समृद्धी टोलनाका इंटरचेंज जवळ गुरुवार दि.२ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास अवैधरीत्या बंदी असलेली सुगंधित तंबाखू, जर्दा, गुटखा वाहतूक करणारा कंटेनर पकडला. या कंटेनरमधुन ६९ लाख ३३ हजार रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

Monsoon Rain Update: बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनचे वारे सक्रिय; ‘या’ जिल्ह्यांसाठी पुढील ७२ तास महत्वाचे

गुटखा तस्करीसाठी वापरण्यात आलेला कंटेनर ही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी फिर्यादी सुहास जिभाऊ मंडलिक, वय ५४ वर्षे, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन (म.रा.), सह आयुक्त नाशिक विभाग यांच्या फिर्यादीवरून राजेश गोवर्धनलालजी वर्मा (माळी) वय ५३, रा डोसीगांव ता. जि. रतलाम, मध्यप्रदेश, जालीम सिंग, रा. सेन्ट्रल पॉईंट, इंदोर, मध्य प्रदेश, व एका मोबाईल नंबरवरील कॉल करणारा अज्ञात इसम (नाव गाव माहित नाही) या ३ संशयित आरोपींवर इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गामधनी, गोपनिय पोलीस निलेश देवराज, अभिजित पोटींदे, दिपक मोरे, सचिन बाबा, विजय रूद्रे, मधुकर पवार आदी पोलीस पथक पुढील तपास करीत आहे.

ताज्या बातम्या

default-featured-image

IND vs PAK Asian Games 2026 Final : भारताचा पाकिस्तानवर ‘सुवर्ण’...

0
नवी दिल्ली | New Delhi आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील सुवर्णपदकाच्या अंतिम सामन्यात भारताने (Team India) पाकिस्तानचा पराभव केला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात भारताने...