नाशिक | प्रतिनिधी
महानगरपालिकेच्या विविध विषयांवरील कामकाजाला गती देण्यासाठी पाच महत्त्वाच्या समि त्यांवर एकूण ४५ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी (दि.२०) झालेल्या महासभेत महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी या सदस्यांच्या नावांची घो षणा केली. त्यानंतर महासभेत नवनियुक्त समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला. महापालिकेच्या कामकाजात समित्यांना विशेष महत्त्व असून, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, वैद्यकीय सहाय्य व आरोग्य, विधी आणि शिक्षण या पाच समित्यांवर प्रत्येकी नऊ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित विषयांवरील प्रश्न, प्रस्ताव आणि धोरणात्मक बाबींवर समित्यांच्या माध्यमातून चर्चा होऊन प्रशास-नाला आवश्यक त्या शिफारशी करता येणार आहेत.
विधी समितीवरही सदस्य निश्चित
विधी समितीवर जुई प्रणव शिंदे, अंकिता महेंद्र शिंदे, विश्वास चिंतामण नागरे, राजेंद्र विनायक आहेर, भूषण सुरेश राणे, कविता अमोल नाईक, आशा रफिक तडवी, संजीवनी संजय हंडोरे आणि मुकेश दिलीप शहाणे यांची नियुक्ती करण्यात आली. महापालिकेशी संबंधित कायदेशीर प्रकरणे, न्यायालयीन बाबी आणि विविध प्रस्तावांच्या कायदेशीर बाजूंचा अभ्यास करण्यासाठी या समितीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
पडसाद : सत्तेचा सोहळा आणि निष्ठेची उपेक्षा!
शिक्षण समितीवर नऊ सदस्य
शिक्षण समितीवर कैलास सुरेश मुदलियार, नयना निलेश जाधव, किरण वसंतराव राजवाडे, सीमा विशाल पवार, छाया दिलीप देवांग, सोनाली तुषार मंदुरे, सचिन रमेश मराठे, शरद चिंतामण मोरे आणि शरद हरिभाऊ फडोळ यांची नियुक्ती करण्यात आली. महापालिकेच्या शाळांमधील सुविधा, समस्या, पायाभूत व्यवस्था आदी विविध योजनांचा आढावा घेण्याचे काम या समितीमार्फत केले जाणार आहे.
शहर सुधारणा समितीवर नऊ सदस्य
शहर सुधारणा समितीवर रूपाली स्वप्निल नन्नावरे, उषा हिरामण बॅडकोळी, श्वेता निर्मल भंडारी, जयंत अशोक जाचक, संध्या अभिजीत कुलकर्णी, प्रवीण मंदाकिनी रमेश जाधव, प्रमोद बापू देवराम पालवे, योगेश वामन भोर आणि जागूती दत्तू गांगुर्डे यांची नियुक्ती करण्यात आली. हरातील पायाभूत सुविधा, नागरी विकास, विविध सुधारणा योजना आणि नागरिकांशी संबंधित प्रश्नांवर या समितीच्या माध्यमातून चर्चा होणार आहे.
आरोग्य समितीचीही स्थापना
वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समितीवर वाळू विश्वनाथ काकड, सविता रविंद्र काळे, राहुल शांताराम शेलार, साधना पवन मटाले, सतीश आनंदराव निकम, पुनम योगेश महाले, नितीन पंडित दातीर, वैशाली विनोद दळवी आणि डॉ. हेमलता निनाद पाटील यांची नियुक्ती झाली. महापालिकेच्या आरोग्य केंद्रांचे कामकाज, नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधा, वैद्यकीय सहाय्य तसेच सार्वजनिक आरोग्याशी संबंधित प्रश्नांचा आढावा घेण्याची जबाबदारी या समि तीवर असणार आहे.
महिला व बालकल्याण समिती
महिला व बालकल्याण समितीवर ज्योती अनिल जोंधळे, इंदुबाई सुदाम नागरे, प्रमिला कैलास मैद, चित्रा जगन्नाथ तांदळे, भारती रवींद्र धिवरे, स्वाती राजीव भामरे, कोमल प्रताप मेहोलिया, रूपाली यशवंत निकुळे आणि सीमा रंजन ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली. महिला व बालकांच्या प्रश्नांवर काम करणे, महापालिकेच्या विविध योजनांचा आढावा घेणे, महिला व बालकल्याणाशी संबंधित सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रशासनाला सूचना करणे, अशी महत्त्वाची जबाबदारी या समित्तीवर राहणार आहे.




