Monday, July 8, 2024
HomeनाशिकLoksabha Election 2024 : सायंकाळी पाच वाजेपर्यंत नाशिक लोकसभेसाठी ५१.१६ तर दिंडोरीसाठी...

Loksabha Election 2024 : सायंकाळी पाच वाजेपर्यंत नाशिक लोकसभेसाठी ५१.१६ तर दिंडोरीसाठी ५७.०६ टक्के मतदान

नाशिक | Nashik

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Eletion) पाचव्या टप्प्यातील मतदान (Voting) आज पार पडत असून सकाळपासून विविध मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांचा उत्साह दिसून येत आहे. या पाचव्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी (Nashik and Dindori) या दोन लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होत आहे. या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांची गर्दी दिसून येत होती. त्यामुळे अधिक प्रमाणावर या दोन्ही मतदारसंघात मतदान (Voting) होण्याची शक्यता वर्तवली जात होती. अशातच आता या दोन्ही मतदारसंघातील सकाळी सात वाजेपासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत किती टक्के मतदान झाले याची टक्केवारी समोर आली आहे.

हे देखील वाचा : Loksabha Election 2024 : दुपारी तीन वाजेपर्यंत नाशिकसाठी ३९.४१ तर दिंडोरी लोकसभेसाठी ४५.९५ टक्के मतदान

त्यानुसार नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही मतदारसंघांमध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत अनुक्रमे ६.४५ आणि ६.४० टक्के मतदान झाले होते. तर अकरा वाजेपर्यंत हीच आकडेवारी वाढून अनुक्रमे १६.३० आणि १९.५० टक्के इतकी झाली होती. त्यानंतर दुपारी एक वाजेपर्यंत नाशिकसाठी २८.५१ आणि दिंडोरीसाठी ३३.२५ टक्के इतके मतदान झाले होते. तर दुपारी तीन वाजेपर्यंत नाशिक लोकसभेसाठी ३९.४१ टक्के तर दिंडोरीसाठी ४५.९५ टक्के मतदान झाले होते. यानंतर आता संध्याकाळी पाच वाजेपर्यंत नाशिकसाठी ५१.१६ टक्के तर दिंडोरीसाठी ५७.०६ टक्के इतके मतदान झाले असून या दोन्ही मतदारसंघांची विधानसभानिहाय टक्केवारी देखील समोर आली आहे.

हे देखील वाचा : Loksabha Election 2024 : सकाळी अकरा वाजेपर्यंत नाशिकमध्ये १६.३० तर दिंडोरीत १९.५० टक्के मतदान

त्यामध्ये नाशिक मध्य मतदारसंघात ५१.०१ टक्के, देवळाली मतदारसंघात ४९.०८ टक्के, नाशिक पश्चिममध्ये ४५.०८ टक्के, नाशिक पूर्वमध्ये ४९.२३ टक्के, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघामध्ये ५७.११ टक्के आणि सिन्नर मतदारसंघांमध्ये ५८.०७ टक्के इतके मतदान झाले आहे. यात सर्वाधिक मतदान हे सिन्नर मतदारसंघात ५८.०७ टक्के तर सर्वात कमी नाशिक पश्चिम मतदारसंघात ४५.०८ टक्के इतके मतदान झाले आहे.

हे देखील वाचा : Nashik-Dindori Constituency 2024 : उमेदवारांसह आमदारांनी बजावला मतदानाचा हक्क

तर दिंडोरीतील विधानसभानिहाय टक्केवारीचा विचार केल्यास संध्याकाळी पाच वाजेपर्यंत नांदगावमध्ये ५२.०८ टक्के, येवल्यात ५०.३३ टक्के, कळवण मतदारसंघात ६२.२८ टक्के, चांदवड मतदारसंघात ५९.१५ टक्के, निफाडमध्ये ५७.०१ टक्के आणि दिंडोरी मतदार संघामध्ये ६२.०३ टक्के इतके मतदान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक मतदान हे कळवणमध्ये ६२.२८ टक्के तर सर्वात कमी येवल्यात ५०.३३ टक्के इतके मतदान झाले आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघ मतदानाची टक्केवारी

तसेच धुळे लोकसभेसाठी (Dhule Loksabha) देखील आज मतदान होत असून या मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४८.८१ टक्के मतदान झाले आहे. यात विधानसभानिहाय मतदानाच्या टक्केवारीचा विचार केल्यास धुळे ग्रामीण ५०.३१ टक्के, धुळे शहर ४६.१६ टक्के, शिंदखेडा ४५.८४ टक्के, मालेगाव मध्य ५७.०२ टक्के, मालेगाव बाह्य ४७ टक्के आणि बागलाणमध्ये ४७.०१ टक्के इतके मतदान झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या