Saturday, October 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूज'अग्नी-४’ या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

‘अग्नी-४’ या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

- Advertisement -

‘अग्नी-४’ या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची, 6 ऑगस्ट 2026 रोजी, ओडिशामधील चांदिपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रात (इंटिग्रेटेड टेस्ट रेंज) यशस्वी चाचणी घेण्यात आली. या प्रक्षेपणाच्या माध्यमातून क्षेपणास्त्राच्या सर्व परिचालनात्मक आणि तांत्रिक निकषांची पडताळणी करण्यात आली. ही चाचणी ‘स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड’ च्या देखरेखीखाली घेण्यात आली.

हे क्षेपणास्त्र सुमारे ४,००० किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकते. पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे आणि दोन टप्प्यांचे (टू-स्टेज) सॉलिड-फ्युएल क्षेपणास्त्र आहे. असून क्षेपणास्त्र भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) विकसित केले आहे. हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असून भारताच्या सामरिक प्रतिबंधक क्षमतेला अधिक बळकट करते.

ताज्या बातम्या