Wednesday, September 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजबंडखोर ६ खासदार मुंबईत दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला रवाना, थोड्याचवेळात अधिकृत...

बंडखोर ६ खासदार मुंबईत दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला रवाना, थोड्याचवेळात अधिकृत प्रवेश करण्याची शक्यता

मुंबई | Mumbai
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील आणि नागेश पाटील आष्टीकर हे सहा खासदार आज पक्षांतर करून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या वृत्तावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. १९ जूनला हे खासदार शिंदेसेनेत प्रवेश करतील अशी चर्चा होती. परंतु काही खासदारांचे तळ्यात मळ्यात असल्यामुळे हा प्रवेश रखडला. मात्र आता हे खासदार अधिकृतपणे शिंदेसेनेत प्रवेश करतील असे पुढे आले आहे.

- Advertisement -

शिवसेना ठाकरे गटातून फुटून शिंदे सेनेत दाखल होणारे ६ ही खासदार आज अधिकृतपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः यासंदर्भात मोठी माहिती दिली असून, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व ६ खासदारांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय आज नाही, तर एक आठवड्यापूर्वीच घेतला होता. कायदेशीर आणि इतर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आज या निर्णयावर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे.

या ६ खासदारांनी गेल्याच आठवड्यात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिले आहे. त्यात आम्ही मूळ शिवसेना, जी एकनाथ शिंदेंकडे आहे. ज्याचे चिन्ह धनुष्यबाण आहे अशा पक्षात आम्ही ६ जण विलीनीकरण करतोय असे पत्रात म्हटले आहे. या पत्राबाबत खुलासा आज एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत खासदार करतील असे त्यांनी सांगितले.

Sanjay Raut: गोकुळ गितेंनी आमच्याकडे सहकार्य मागितलं…; संजय राऊतांचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाले?

आज मुंबईत होणाऱ्या एका विशेष कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा जाहीर प्रवेश सोहळा पार पडणार आहे. ६ खासदारांच्या या ‘एन्ट्री’मुळं संसदेत आणि राज्यातील राजकारणात शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

बंडखोर खासदार मुंबई दाखल
६ बंडखोर खासदार हे थोड्याच वेळापूर्वी मुंबईत दाखल झाले असून ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले आहे. शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या नंदनवन येथे सगळे खासदार पोहोचले असून थोड्याच वेळात ते अधिकृत पत्रकार परिषद घेत शिवसेनेत प्रवेश करणार आहे.

उद्धव ठाकरेंच्या सहा खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर दिल्ली , तिरुपती, अयोध्या, वाराणसी, देहरादून आणि मुंबई असा खासदारांनी प्रवास केल्याचा माहिती समोर आली आहे. मुंबईत भाऊसाहेब वाकचौरे, संजय देशमुख , संजय जाधव आणि नागेश पाटील आष्टीकर हे दाखल झाले आहेत. तर हे खासदार आता मुंबईतील एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी गेले आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : खासगी बसची दुचाकीला धडक; विवाहितेचा मृत्यू, रक्षाबंधन आटोपून...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik माहेरचा रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करून पतीसोबत सासरी परतणाऱ्या एका २७ वर्षीय विवाहितेचा रस्ते अपघातात मृत्यू (Road Accident Deth) झाल्याची...