Sunday, September 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Nashik News : जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

इंदिरानगर | वार्ताहर Indiranagar

- Advertisement -

पाथर्डी- पिंपळगाव खांब शिवरस्ता परिसरातील महालक्ष्मी नगर येथे जमिनीच्या वादातून पाच ते सहा जणांच्या मारहाणीत सामाजिक कार्यकर्ते दत्तू अर्जुन जाधव (६५) मृत्यू झाला.

संशयित आरोपी व दत्तू अर्जुन जाधव यांच्यामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून जमिनीचा वाद सुरू होता. शनिवारी दत्तू जाधव हे पाथर्डी फाटा येथे आषाढी एकादशीनिमित्त फराळ वाटपाचा कार्यक्रम आटोपून घराकडे येत असताना महालक्ष्मी नगर येथे त्यांच्यावर संशयितांनी हल्ला केला.

दरम्यान छातीवर मार लागल्याने पुढे जाऊन काही वेळातच ते खाली कोसळले. त्यांना तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.

याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सर्व संशयितांना ताब्यात घेतले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजकारणात टीका करताना लक्ष्मणरेषेचे भान ठेवा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राजकीय टीका करताना कौटुंबिक विषय टाळले पाहिजेत. आमच्यावर राजकीय टीका करा, आमच्या कार्यपद्धतीवर किंवा सरकारच्या कामावर टीका करा, मात्र कौटुंबिक वादात...