मुंबई |
डिलिमिटेशन विधेयकाच्या मुद्द्यावर इंडिया आघाडीला मोठा राजकीय धक्का बसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. इंडिया आघाडीचे नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यात सुमारे ७० मिनिटे चर्चा झाली. मात्र, या बैठकीत राहुल गांधी यांनी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले नसल्याची चर्चा असून, विधेयक मांडण्यापूर्वी आघाडीसमोर राजकीय पेच निर्माण झाला आहे.
डिलिमिटेशन विधेयक संसदेत मांडण्यास काही तास शिल्लक असताना इंडिया आघाडीच्या हालचालींना अपेक्षित यश मिळाले नसल्याने राहुल गांधींसह आघाडीच्या नेत्यांची चिंता वाढल्याचे सांगितले जात आहे. स्टॅलिन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली.
शरद पवारांच्या भेटीसाठी मुंबईत धाव
दरम्यान, इंडिया आघाडीचे नेते आता शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत काँग्रेस नेते तसेच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आघाडीच्या नेत्यांचे स्वागत केले. हे नेते लवकरच ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
डिलिमिटेशन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्याशी होणारी ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात असून, या बैठकीत पुढील राजकीय रणनीती आणि आघाडीची भूमिका याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.




