नवी दिल्ली | New Delhi
पहाटेचा प्रवास अनेक प्रवाशांसाठी अखेरचा ठरला! उत्तराखंडमधील टिहरी गढवाल जिल्ह्यात ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्गावर प्रवाशांनी खचाखच भरलेली बस पुलावरून सुमारे १०० मीटर खोल दरीत कोसळून भीषण दुर्घटना घडली. मंगळवारी (१७ नोव्हेंबर) पहाटे गूलर बाजार परिसरात हा अपघात झाला. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून २६ प्रवासी जखमी झाले आहेत. बसमध्ये अंदाजे ३० ते ३५ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF), पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुनिकिरेती पोलिस ठाण्याच्या हद्दीत हरिद्वारहून चमोलीकडे जाणारी विश्वनाथ सेवेची बस आज सकाळी ऋषिकेशजवळील गुलेर परिसरात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने पुलावरून कोसळून खोल दरीत पडली. या अपघातामध्ये आतापर्यंत १९ जखमी प्रवाशांना वाचवून एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. या पैकी ७ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर एका प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रशासन, पोलिस आणि एसडीआरएफचे जवान घटनास्थळी बचावकार्य करत आहेत.
Rishikesh, Uttarakhand: Following the major bus accident on the Rishikesh-Badrinath Highway, critically injured passengers and deceased victims were brought to AIIMS Rishikesh by ambulance. 22 critically injured passengers have been admitted to the hospital’s trauma centre. https://t.co/KuEcy6JgyC— IANS (@ians_india) November 17, 2026
रुद्रप्रयागमध्ये एका कारला अपघात
दुसरीकडे उत्तराखंडमधील आणखी एका रस्ते अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला. रुद्रप्रयागमध्ये एका कारला अपघात झाला. हे सर्वजण एका लग्नाहून परत येत होते. सोमवारी रात्री ९ वाजता हे सर्वजण लग्न सोहळ्यावरून परत येत असताना ही घटना घडली. कार अनियंत्रित होत दरीत कोसळली. या कारमधून १० जण प्रवास करत होते. यातील चौघांचा मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या सहा जणांवर उपचार सुरू आहेत. चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर श्रीनगर येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
देशदूतच्या फेसबुक पेजला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




