Tuesday, November 17, 2026
Homeदेश विदेश"मी गर्लफ्रेंडला त्याच रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेलो जिथे..."! राहुल गांधींनी खास किस्सा शेअर...

“मी गर्लफ्रेंडला त्याच रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेलो जिथे…”! राहुल गांधींनी खास किस्सा शेअर केला

नवी दिल्ली | New Delhi
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या belonging: a Journey of Love या पुस्तकाचे काल औपचारिक प्रकाशन झाले. हा सोहळा दिल्लीत पार पडला. या पुस्तकाच्या माध्यमातून सोनिया गांधी यांनी अनेक प्रकरणे लिहीली आहे ज्यामुळे पुस्तक प्रकाशना आधीच बराच वादंग झाला. या प्रकाशन सोहळ्यात राहुल गांधी यांनी आपल्या खासगी आयुष्याशी आणि कॉलेजच्या दिवसांतील किस्सा शेअर केला. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी पहिल्यांदाच सार्वजनिकपणे आपल्या गर्लफ्रेंडचा उल्लेख करताच सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले.

या कार्यक्रमाला राहुल गांधी, प्रियांका गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, तसंच काही राज्यांचे मुख्यमंत्री आणि दिग्गज नेतेही उपस्थित होते. या कार्यक्रमात राहुल गांधींनी सांगितलेला त्यांच्या गर्लफ्रेंडचा किस्सा चर्चेत आला आहे.

- Advertisement -

राहुल गांधींनी काय सांगितलं?
मी त्या वेळी केंब्रिंज विद्यापीठात शिकत होतो. मी त्याच काळात माझ्या गर्लफ्रेंडला म्हटलं की चर आज आपण वर्सिटी रेस्तराँमध्ये जाऊ. तिला हे माहीत नव्हतं की हे कुठलं रेस्तराँ आहे. आम्ही तिथे गेलो होतो. मला खरंतर ती जागा बघायची होती जिथे माझे आई वडील म्हणजेच सोनिया गांधी आणि राजीव गांधी भेटले होते. आम्ही त्या ठिकाणी जाईपर्यंत माझ्या गर्लफ्रेंडला हे ठाऊक नव्हतं. असंही राहुल गांधी म्हणाले.

माँ की किताब Belonging: A Journey of Love के लॉन्च पर अचानक बचपन से अब तक की कितनी ही यादें ताज़ा हो गईं।

सोनिया गांधी को जानना हो, तो एक बार उन्हें मेरी नज़रों से देखिए। उनका हौसला, उनकी संवेदनशीलता और तमाम मुश्किलों के बावजूद ज़िंदगी को प्यार से गले लगाने की उनकी खूबसूरत क्षमता – यही है मेरी माँ।

आज माँ की किताब को इतना प्यार और अपनापन देने के लिए आप सभी का दिल से शुक्रिया। ये मोहब्बत यादगार है। ❤️— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 16, 2026

पुढे राहुल गांधी म्हणाले, आम्ही तिथे पोहचलो. मला तिथे असलेला पिवळ्या रंगाचा दरवाजाही लक्षात आहे. रेस्तराँच्या माणसाने विचारलं किती जण आहात मी म्हटलं दोघं. त्यावर तो म्हणाला या आतमध्ये बसा. त्यांनी आम्हाला मेन्यू कार्ड दिलं. त्या कर्मचाऱ्याला मी म्हटलं तुम्हाला ठाऊक आहे का? माझे आई वडीलही इथेच भेटले होते. त्यावर त्या कर्मचाऱ्याने मला नीट निरखून पाहिलं आणि म्हणाले की होय मला माहीत आहे तुमचे आई वडील इथेच भेटले होते. त्यावर मी विचारलं तुम्ही त्यांना ओळखलं का? त्यावर तो कर्मचारी म्हणाला होय मला कळलं आहे तुम्ही कुणाबद्दल बोलत आहात. मग माझ्या गर्लफ्रेंडला मी सांगितलं की माझे आई वडील इथेच भेटले होते. आम्ही त्या रेस्तराँमध्ये चिकन चॅसर ही डिश खाल्ली. असं राहुल गांधींनी म्हटलं आहे. हा खास किस्सा सांगताना राहुल गांधींनी पहिल्यांदा सार्वजनिकपणे त्यांच्या गर्लफ्रेंडचा उल्लेख केला आहे.

#WATCH | Delhi: At the launch event of Sonia Gandhi’s memoir, ‘Belonging: A Journey of Love’, Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi says, “I see Amrinder Singh Ji here… We saw them (Rajiv Gandhi and Sonia Gandhi) argue, but we only saw them fight once. The coincidence of coincidences, my father was speaking to Amrinder Singh on the phone when it happened… That was the only time we ever saw them fight. I’ve never seen this in another house. Every meal, there would be Papa, and on Papa’s lap, there would be Mamma. I thought this was a normal thing, so I would go to my friend’s house, and they wouldn’t be sitting in each other’s laps. I’d ask my friends, “Guys, what is going on? Why is your mother not sitting on your father’s lap?” At lunchtime, dinnertime, Mamma was sitting on Papa’s lap…”

(Source: Congress)— ANI (@ANI) November 16, 2026


मात्र, या पदार्थाची चव त्यांना फारशी आवडली नाही. विशेष म्हणजे, त्यांच्या आई-वडिलांना या रेस्टॉरंटमधील जेवण खूप चांगले वाटत होते; पण स्वतःचा अनुभव सांगताना राहुल गांधी यांनी जेवण अजिबात चांगले नसल्याचे विनोदी शैलीत म्हटले. तुम्हाला प्रेमात पडायचे असेल तर केंब्रिजमधील वर्सिटी रेस्टॉरंटमध्ये जा. मात्र, तिथे गेल्यानंतर चिकन चॅसर हा पदार्थ अजिबात खाऊ नका. कारण त्याची चव चांगली नाही. राहुल गांधींच्या या विनोदी विधानामुळे कार्यक्रमात उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. सोनिया गांधींसह सगळे खळखळून हसले.

पहाटेचा प्रवास अनेकांसाठी ठरला अखेरचा! प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू

राहुल गांधी यांनी भाषणात गर्लफ्रेंडचा उल्लेख केल्यानंतर प्रसारमाध्यमांमध्ये त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा सुरू झाली. कार्यक्रमानंतर पत्रकारांनी त्यांना थेट प्रश्न विचारला की, तुमच्या भाषणात ज्या गर्लफ्रेंडचा उल्लेख केला, ती आता कुठे आहे? यावर राहुल गांधी यांनी अगदी थोडक्यात उत्तर दिले. ते म्हणाले, ‘ती आता माझी चांगली मैत्रीण आहे.’ त्यांच्या या उत्तरामुळेही उपस्थितांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. मात्र, त्यांनी त्या महिलेबाबत अधिक कोणतीही वैयक्तिक माहिती दिली नाही. मात्र तरीदेखील राहुल गांधी यांची ही मैत्रिण कोण आहे?, याची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

ताज्या बातम्या

​Nashik Crime News : सिंहस्थापूर्वीच सायबर चाेरांचे ‘डिजिटल जाळे’; प्राधिकरणाचे फेक...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik आगामी सिंहस्थाच्या (Simhastha Kumbhmela) निमित्ताने नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये (Nashik-Trimbakeshwar) देश-विदेशातून लाखो भाविक येण्याची शक्यता लक्षात घेता, या सोहळ्याच्या आडून नागरिक...