Thursday, October 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूज९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गीताचे लोकार्पण

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गीताचे लोकार्पण

पुणे| प्रतिनिधी Pune

- Advertisement -

सातारा जिल्ह्याचे भौगोलिक महत्त्व अधोरेखित करत मराठी भाषा, मराठी बाणा, भाषेच्या संघर्षाचे, मराठ्यांच्या राजधानीचे तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य विस्तारक छत्रपती शाहू महाराज यांच्या वैभवशाली परंपरेचे दर्शन घडवित सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सामाजिक योगदानाचे प्रतिबिंब दर्शविणारे ‘हे शतकपूर्व संमेलन साताऱ्याचे; गाणे जणू सह्याद्रीच्या हिरवाईचे’ या संमेलन गीतातून घडले.

निमित्त होते अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सातारा येथे होत असलेल्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी खास तयार करण्यात आलेल्या संमेलन गीताच्या लोकार्पण सोहळ्याचे! संमेलन गीताचे लोकार्पण आज (दि. १९) सुप्रसिद्ध कवी डॉ. विठ्ठल वाघ यांच्या हस्ते झाले.

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा शाहूपुरी (सातारा) यांच्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, संमेलन गीताचे लेखक राजीव मुळ्ये, गायक विनल देशमुख व्यासपीठावर होते.

साताऱ्यात तब्बल ३३ वर्षांनंतर १ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. साताऱ्यात होत असलेले हे चौथे संमेलन असून सातारच्या भूमीची सर्वांगिण महती दर्शविणारे सात मिनिटांचे हे पहिलेच संमेलन गीत आहे.

स्वागतपर प्रास्ताविकात विनोद कुलकर्णी यांनी संमेलन गीताच्या निर्मितीची माहिती दिली. तर संमेलन गीताचे लेखक राजीव मुळ्ये यांनी गीत कसे घडले याविषयी विवेचन केले. मनोगत व्यक्त करीत गायक विनल देशमुख यांनी गीताचे ध्रुवपद सादर केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले तर आभार सुनिताराजे पवार यांनी मानले.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : सिंहस्थाच्या तोंडावर झारखंड गँग नाशिकमध्ये; चोरी, दरोड्याचा...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी (Nashik Police) शहरात सुरू केलेल्या हाय-अलर्ट व विशेष गस्त मोहिमेमुळे एक आंतरराज्यीय गुन्हेगारांटी टोळी...