Friday, October 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजIND vs SL Asian Games 2026 : भारताकडून श्रीलंकेचा १२४ धावांनी धुव्वा;...

IND vs SL Asian Games 2026 : भारताकडून श्रीलंकेचा १२४ धावांनी धुव्वा; ‘सुवर्ण’साठी पाकिस्तानशी भिडणार, कधी होणार लढत?

मुंबई | Mumbai

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने श्रीलंकेचा १२४ धावांनी पराभव केला आहे. त्यामुळे भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी १७० धावांचे लक्ष्य ठेवले होते. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवातीला घसरगुंडी उडाली होती. मात्र, इशान किशनच्या नाबाद अर्धशतकामुळे भारताने २० षटकांत ७ गडी गमावून १६९ धावांपर्यंत मजल मारली होती. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपूर्ण डाव अवघ्या ४५ धावांवर आटोपला.

- Advertisement -

दरम्यान भारताच्या डावाची सुरुवात अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशीने केली. मात्र, शर्मा स्वस्तात माघारी परतल्याने भारताची फलंदाजी ढेपाळली. त्यानंतर आलेला संजू सॅमसनही लवकर बाद झाला. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन हे दोघेही प्रत्येकी सात धावा काढून बाद झाले. तर तिलक वर्माने फक्त दोन धावा केल्या. याशिवाय अक्षर पटेल ८, शिवम दुबे ३ आणि कर्णधार श्रेयस अय्यर १३ धावांवर माघारी परतले.

दुसरीकडे ईशान किशनने बाजू सांभाळत भारताची धावसंख्या १६९ पर्यंत पोहचविण्यात हातभार लावला. सलामीवीर वैभव सूर्यवंशीने २१ चेंडूंमध्ये ३८ धावा केल्या.या खेळीत त्याने ६ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. तर ईशान किशनने ४५ चेंडूंमध्ये नाबाद ८० धावांची खेळी केली. यात ४ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. त्यानंतर आता भारताचा अंतिम सामना ३ ऑक्टोबर रोजी सुवर्णपदकासाठी पाकिस्तानसोबत होणार आहे.

श्रीलंकेची उडाली दाणादाण

भारताने दिलेल्या १७० धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवातीपासूनच दाणादाण उडाल्याचे बघायला मिळाले. भारतीय गोलंदाजांनी लागोपाठ गडी बाद केल्याने श्रीलंकेची अवस्था बिकट झाली होती. नवव्या षटकांनंतर श्रीलंकेचे ४३ धावांत ७ गडी बाद अशी होती. त्यानंतर अभिषेक शर्माने चेंडू हातात घेत इतर फलंदाजांना बाद केल्याने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

ताज्या बातम्या

ठाकरे

ठाकरे बंधूंच्या जनमोर्चाच्या मार्गात बदल, आता ‘असा’ असेल मार्ग

0
मुंबई | प्रतिनिधीभारत निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकाराने उद्या, रविवारी काढण्यात येणाऱ्या मोर्चाचा मार्ग बदलण्यात आला...