Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेशCBI अधिकाऱ्यांसाठी आता ‘ड्रेस कोड’

CBI अधिकाऱ्यांसाठी आता ‘ड्रेस कोड’

दिल्ली | Delhi

CBI अर्थात राष्ट्रीय गुन्हेअन्वेशन विभाग हा नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. आता CBI आणखी एका कारणामुळे चर्चेत आले आहे.

- Advertisement -

CBI चे नवे संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांनी आपला पदभार स्विकारताच अधिकाऱ्यांसाठी अथवा स्टाफसाठी ड्रेस कोड निर्धारित केला आहे. सुबोध जयस्वाल यांनी गेल्या बुधवारी सीबीआयचे ३३ वे संचालक म्हणून पदभार स्विकारला आहे.

CBI चे संचालक सुबोध जयस्वाल यांच्या आदेशानुसार सहाय्यक संचालक अनूप टी मॅथ्यू यांनी एक निवेदन जारी केलं आहे. त्यानुसार CBI कार्यालयात आता जीन्स, टी-शर्ट, स्पोर्ट्स शूज किंवा चप्पल घालून येता येणार नाही. पुरुष अधिकाऱ्यांना कार्यालयात फॉर्मल शर्ट-पॅन्ट आणि फॉर्मल शूज घालूनच यावं लागणार आहे. त्याचबरोबर योग्य पद्धतीने दाढी/शेविंग करावं लागणार आहे.

तर महिला अधिकाऱ्यांनी फक्त साडी, सूट आणि फॉर्मल शर्ट घालूनच कार्यालयात येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, CBI अधिकाऱ्यांकडून जयस्वाल यांच्या या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे. तसंच यापुढेही अनेक महत्वाचे बदल होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या