Thursday, May 2, 2024
Homeनगरवाळू प्रकरणावरुन दोन गटांत घमासान

वाळू प्रकरणावरुन दोन गटांत घमासान

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

दोन दिवसांपूर्वी गोदावरी नदीपात्रातून बेकायदा वाळू उपसण्यावरून दोन टोळ्यांमध्ये वाद झाला. हा वाद ताजा असतानाच काल पुन्हा गोंधवणी परिसरात या दोन टोळ्यामध्ये चांगले युध्द पहायला मिळाले. मात्र याप्रकरणी हा वाद श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यापर्यंत गेला मात्र रात्री उशिरापर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती.

- Advertisement -

गोदावरी नदीपात्रातील नायगाव, मातुलठाण शिवाजवळ एका टोळीने आपला वाळू स्पॉट तयार केलेला आहे. या ठिकाणाहून या टोळीच्या ट्रका चालतात. हा स्पॉट एका टोळीच्या प्रमुखाचा असल्याने दुसरे कोणी तिकडे जात नाही. दुसर्‍या एका टोळीतील काही गाड्या या स्पॉटवर रात्रीच्यावेळी गाड्या भरायला गेल्या असता सदर गाड्या फुकट भरून देण्यास या ठिकाणी ज्या टोळी प्रमुखाचा स्पॉटवर दावा आहे त्याने पैसे दिले तरच गाड्या भरुन देण्याचा आदेश दिला. परंतु या गाड्या दुसर्‍या एका टोळीच्या असल्याने त्यांनी या ठिकाणी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यावरुन भांडणे झाली. त्यानंतर दुसर्‍या टोळीतील काही जण आपल्या चारचाकी वाहनाने वाळूच्या स्पॉटकडे जात असताना गोंडेगाव रोडला समोरच्या टोळीतील तरूणांशी सामना झाला. यात दुसर्‍या टोळीतील एकाची गाडी दगडफेक करुन फोडण्यात आली. या दगडफेकीत सदर टोळीतील एक प्रमुखही जखमी झाला.

याप्रकरणी काल श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. मात्र काल गोंधवणी परिसरात सुरु असलेल्या या घमासानमध्ये गाड्यांची नासधूस करण्यात आली तर काहींना मारहाणही करण्यात आली. यात कोण जखमी झाले, याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र या वादाची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलीस त्याठिकाणी पोहोचले व दोन्हीकडील लोकांना पोलीस ठाण्यात आणले. मात्र याप्रकरणी पुढे काय कार्यवाही झाली याबाबत माहिती मिळू शकली नाही. आता थोड्यावर निभावले असले तरी भविष्यात या दोन टोळ्यामंध्ये आणखी संघर्ष होण्याची चर्चा या परिसरात सुरु होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या