Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेशकोव्हॅक्सीनवर राजकारण : गायीच्या बछड्याचा आरोपानंतर भाजप आक्रमक

कोव्हॅक्सीनवर राजकारण : गायीच्या बछड्याचा आरोपानंतर भाजप आक्रमक

नवी दिल्ली

कोविशील्ड लसींच्या दोन डोसमधील आंतराचा वाद अजून शमला नसतांना कोव्हॅक्सीनवर राजकारण सुरु झाले. कोरोनावरील लस कोव्हॅक्सीन बनविण्यासाठी गाईच्या बछड्याच्या सीरमचा वापर केला जात आहे, असा दावा काँग्रेसचे नेते गौरव पांधी यांनी केल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. यावर कोव्हॅक्सीन बनवणारी भारत बायोटेक, आरोग्य मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. दुसरीकडे भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी गांधी घराण्यातील कोणी लस घेतली आहे का? काय गांधी परिवारास लसीवर विश्वास आहे? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

- Advertisement -

कोविशील्डच्या दोन डोसमधील आंतरावरुन राजकारण पेटले? जाणून घ्या कारण

कोरोनावरील लस कोव्हॅक्सीन बनविण्यासाठी गाईच्या बछड्याच्या सीरमचा वापर केला जात आहे. त्यासाठी २० दिवसांपेक्षाही कमी वयाच्या बछड्यांना ठार मारण्यात येते. काँग्रेसचे नेते गौरव पांधी यांनी एका माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीच्या आधारे हा दावा केला आहे. विकास पाटनी नावाच्या व्यक्तीने यासंदर्भात माहिती मागवली होती. त्यावर, सेंट्रल ड्रग्स स्टैंडर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशन (CDSCO) ने उत्तर दिले आहे. त्यानंतर वाद सुरु झाला.

भारत बायोटेकने दिले स्पष्टीकरण

काँग्रेस नेते गौरव पांधी यांच्या या दाव्यानंतर, सोशल मिडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यातच आता भारत बायोटेकनेही आपले स्पष्टिकरण दिले आहे. भारत बायोटेकने म्हटले आहे, की व्हायरस लशींच्या निर्मितीत गाईच्या वासरांच्या सीरमचा वापर केला जातो. याचा वापर सेल्सच्या ग्रोथसाठी केला जातो. मात्र, SARS CoV2 व्हायरसची ग्रोथ अथवा फायनल फॉर्म्यूल्यात याचा वापर करण्यात आलेला नाही.भारत बायोटेकचे म्हणणे आहे, की कोव्हॅक्सीन ही पूर्णपणे शुद्ध लस आहे. सर्व प्रकारची अशुद्धी दूर करून ती तयार करण्यात आली आहे. जगभरात गेल्या अनेक दशकांपासून लशीच्या निर्मितीत वासरांच्या सीरमचा वापर केला जात आहे. साधारणपणे गेल्या नऊ महिन्यांपासून यासंदर्भात सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर माहिती देण्यात आली आहे.

आरोग्य मंत्रालयाचा खुलाशा

वादानंतर आरोग्य मंत्रालयाने खुलाशा केला. सोशल मीडियावर कोव्हॅक्सिनसंदर्भात खोटी माहिती पसरवली जात आहे. तथ्यांची चुकीची मांडणी केली जात आहे. नवजात बछड्याच्या सीरमचा उपयोग फक्त वेरोसेल्ससाठी केला गेला. त्यानंतर ते आपोआप नष्ट होते. जेव्हा शेवटच्या टप्प्यात लसीची निर्मिती होते, तेव्हा त्याचा उपयोग केला गेला नाही.

बछड्याचे सीरम नव्हे वेरोसेलचा वापर- भाजप

काँग्रेसचा आरोपानंतर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, काँग्रेसने म्हटले की कोव्हँक्सीन तयार करण्यासाठी बछड्याचे सीरम व रक्त असते. तसेच गाय व बछड्यास मारुन ते तयार केले जात आहे. काँग्रेसकडून हा भ्रम निर्माण केला गेला आहे. लसीत वेरोसलचा वापर केला जातो. हा वेरोसल कालातंराने समाप्त होतो. काँग्रेसकडून लसीसंदर्भात जाणीवपुर्वक गोंधळाचे वातावरण तयार केले जात आहे. काय सोनिया गांधी, राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी लस घेतली आहे का? काय गांधी परिवारास लसींवर विश्वास आहे का?

आजपासून हॉलमार्किंग सक्तीचे, मग घरातील सोन्याचे काय होणार?

- Advertisment -

ताज्या बातम्या