Thursday, May 2, 2024
Homeनगरलक्ष्मणनाथ महाराज यांचे निधन

लक्ष्मणनाथ महाराज यांचे निधन

सोनई (वार्ताहर) – नाथ संप्रदाय करीता मोठे योगदान असलेले व चंद्रगुप्तीचे सलग बारा वर्ष पीर असलेले पीरयोगी लक्ष्मणनाथ महाराज (वय-100) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. नेवासा तालुक्यातील जळका-बाभुळखेडा शिव येथे असलेल्या कानिफनाथ मंदीर परीसरात त्यांचा समाधी सोहळा पार पडला.

समाधी सोहळ्यास योगी, महंत व शिष्यगण उपस्थित होते. यावेळी त्यांचा धर्मनाथ नाथ संप्रदायाप्रमाणे विधीवत सोहळा, पुजन व श्रद्धांजली कार्यक्रम झाला. लक्ष्मणनाथ महाराज यांचे बारा वर्षातून एकदा येत असलेल्या नवनाथ झुंड कार्यक्रमात मोठे योगदान असायचे. अतिशय शिस्तप्रिय म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांचा भक्तवर्ग महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात होता.

- Advertisement -

यावेळी सुखदेवनाथ, महंत योगी अमृतनाथ, महंत आकाशनाथ, महंत चंद्रभगवान,गजानान मुनी आश्रम (हिंगोली)चे मठाधिपती योगी ॠषीनाथ महाराज, महंत नवमीनाथ,मठाधिपती महंत बहसपतीनाथ, हंत दिपकनाथ सह राज्यातून अनेक साधूसंत, योगी, शिष्यगण व मोजके भक्तगण उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या