Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्यासोने 8 हजारांनी स्वस्त, गुंतवणुकीसाठी योग्य काळ आहे का?

सोने 8 हजारांनी स्वस्त, गुंतवणुकीसाठी योग्य काळ आहे का?

मुंबई

जागतिक बाजारपेठेत झालेल्या घडामोडींमुळे देशातल्या सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या (Gold and Silver Rate Today) किंमती उतरल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोने 8,200 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमचा रेकॉर्ड पार केला होता. आता सोने पुन्हा एकदा प्रति दहा ग्रॅम 48 हजार रुपयांच्या खाली आले आहे. तर चांदी 68,000 रुपये प्रति किलोच्या खाली व्यवहार करत आहे.

- Advertisement -

video पंतप्रधान मोदींचा हॉकी टीमला फोन, म्हणाले…

सोन्यात (Gold) गुंतवणूक करण्याची संधी शोधत असाल तर सध्याच्या काळ गुंतवणुकीसाठी चांगला सिद्ध होऊ शकतो. कारण येत्या काही वर्षांत सोन्याचा दर ९० हजारापर्यंत जाण्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहे. जानेवारी -2020 मध्ये सोन्याचे मूल्य सुमारे 40000 रुपये प्रति 10 ग्रॅम होते, जे ऑगस्टमध्ये वाढून 56 हजारांवर गेले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव वधारून 1,813 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर पोचला आहे. तर चांदीचा भाव 25.06 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर स्थिर होता. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक असलेल्या तपन पटेल यांच्या मतानुसार अमेरिकन ट्रेझरीच्या उत्पन्नात आलेली घसरण आणि कोरोना महामारीच्या संसर्गात झालेली वाढ यामुळे सोन्याच्या भावात तेजी आली होती.

  • दुप्पट होऊ शकतो सोन्याचा दर

पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या (Gold) किंमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. HDFC सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस (Stimulus Package) दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या