Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedतुम्हीही व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवता? ही बातमी तुमच्यासाठी

तुम्हीही व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवता? ही बातमी तुमच्यासाठी

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

तुम्हीही व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस (WhatsApp Status) ठेवतात का? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. व्हॉट्सअ‍ॅप लवकरच नवीन एक अपडेट घेऊन येत आहे. मल्टी-डिव्हाईस फीचर (Multi Devise Feature) व्हॉट्सअ‍ॅप येत्या काही दिवसांमध्ये लाँच करणार आहे…

- Advertisement -

मल्टी-डिव्हाईस फीचरच्या माध्यमातून युझर एकाच वेळी चार डिव्हाईसमध्ये व्हॉट्सअ‍ॅप लिंक (WhatsApp link) करू शकणार आहेत. आता व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस फीचरमध्ये काही बदल करीत आहे. 2017 साली स्टेटस (Status) फीचर लाँच करण्यात आले.

स्टेटसद्वारे युझर 24 तासांसाठी फोटो आणि व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅपवर अपलोड (upload) करू शकत होते. आता व्हॉट्सअ‍ॅप युझरच्या प्रोफाईलवर (User profile) स्टेटस जोडण्यासाठी काम करत आहे.

आता नव्या अपडेटमध्ये एखाद्या प्रोफाईल फोटोवर टॅप केल्यानंतर युझर्सला ते प्रोफाईल फोटो पाहायचा आहे की, स्टेटस पाहायचे, असे विचारले जाईल. याबाबत स्क्रिनशॉट WABetaInfo ने शेअर केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या