Thursday, May 2, 2024
Homeनंदुरबारप्रलंबित मागण्यांसाठी ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन

प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन

अक्कलकुवा Akkalkuwa। प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन State Gramsevak Union जिल्हा शाखा नंदुरबारच्या वतीने जिल्हा परिषदेचे प्रशासकीय यंत्रणेने ग्रामसेवकांच्या पूर्ण मागण्या Demands of Gram Sevaks मान्य न झाल्यास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ZP CEO यांना निवेदन देऊन दि.24 ऑगस्ट पासून असहकार आंदोलन Non-cooperation movement करण्याचा इशारा District President Ravindra Valvi व जिल्हा सरचिटणीस रत्नाकर शेंडे District General Secretary Ratnakar Shende यांनी दिला आहे.

- Advertisement -

याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदना नुसार अशी की, दि.7 डिसेंबर 2020 रोजी पर्यंत जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्याने असहकार आंदोलन करण्यात आले होते, मात्र त्यावेळी दि.17 डिसेंबर 2020 रोजी झालेल्या सकारात्मक बैठकीत दि. 31 जानेवारी 2021 पर्यंत सर्वच प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील असे आश्वासन मिळाले परंतु त्यावर सात महिने उलटूनही एकही प्रश्न मार्गी लागला नसल्याने दि.24 ऑगस्ट 2021 पासुन जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक पुनःश्च असहकार आंदोलन करणार असल्याचे निवेदनात सांगितले आहे.

यासोबतच दि.2 सप्टेंबर 2021 रोजी जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या समोरच एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दि.17 सप्टेंबर 2021 रोजी जिल्हा परिषदेच्या समोरच एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दि.27 सप्टेंबर 2021 बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. दि. 4 ऑक्टोबर 2021 राजी पासुन कामबंद व जिल्हा परिषदेचे समोर आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे. असे ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र वळवी यांनी निवेदनात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या