Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्यानिफाडमध्ये 11.5 अंश सेल्सियस नीचांकी तापमानाची नोंद

निफाडमध्ये 11.5 अंश सेल्सियस नीचांकी तापमानाची नोंद

नाशिक

उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला आहे. राज्यात सर्वात कमी तापमानाची (temperature)नोंद निफाडमध्ये झाली. निफाडमध्ये (niphad)11.5 अंश सेल्सिअसची तापमानाची नोंद झाली आहे. जळगावमध्ये (jalgaon)12.8 तर नाशिकमध्ये (nashik)14.2 तापमान नोंदवण्यात आले.

- Advertisement -

सप्टेंबर, ऑक्टोंबर महिन्यात नाशिककरांना तुफान पावसाने झोडपले. त्यानंतर आता नोव्हेंबर महिन्यात थंडी आणि धुक्याच्या दुलईत नाशिक गुरफटून जात आहे. शहरासह जिल्ह्यात पहाटे वातावरणात थंडी वाढताना दिसत आहे. सध्या महाराष्ट्रावर वाहणारे वारे भिन्न आद्रतेसह वेगवेळ्या दिशेनं वाहत आहेत. यामुळे उत्तरेकडील थंडीचा विशेष परिणाम अद्याप महाराष्ट्रात जाणवत नसल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या