Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedभारतीय रेल्वेत 2422 जागांवर थेट भरती, असा करा अर्ज

भारतीय रेल्वेत 2422 जागांवर थेट भरती, असा करा अर्ज

भारतीय रेल्वेकडून चांगली बातमी आहे. भारतीय रेल्वेकडून (Railway Recruitment 2022)तब्बल 2422 पदांवर अप्रेंटिस भरती करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवार www.rrccr.com या संकेतस्थळावरुन नोकरीसाठीचा अर्ज करु शकतात. या भर्ती प्रक्रियेसाठी थेट निवड केली जाणार आहे.

st strike : ‌ एसटी कामगारांना धक्का, न्यायालयाने ठरवला संप बेकायदेशीर

- Advertisement -

मध्य रेल्वे विभागात फिटर, वेल्डर, टर्नर, कारपेंटर, पेंटर, टेलर, मॅकेनिक, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक, प्रोग्रामिंग अँड सिस्टम अॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट सोबतच इतरही ट्रेड्ससाठी नोकरीची संधी असेल. नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2022 आहे.

Video मुख्यमंत्र्यांसाठी वाहतूक थांबवली, सीएमने फटकारले, म्हणाले…कोणी राजे आलेत का?

पात्रता

अर्जदाराला कोणत्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळाकडून दहावी परीक्षेत किमान 50 टक्के गुण असावेत. सोबत ट्रेडमध्ये नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट जे NCVT अथवा SCVT मान्यताप्राप्त असेल ते असावं.

अर्जदारांची निवड मुंबई, क्लस्टर भुसावळ, पुणे, नागपुर आणि सोलापुरमधील विविध युनिट्सवर केली जाईल.

वयोमर्यादा

अप्रेंटिसशिपसाठी किमान वयोमर्यादा 15 वर्षे आणि कमाल 24 वर्षे इतकी आहे. आरक्षित प्रवर्गांसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.

अर्ज कसा करावा ?

  • सर्वप्रथम www.rrccr.com या संकेतस्थळावर जा.

  • तिथे असणाऱ्या रिक्र्यूटमेंट लिंकवर क्लिक करा.

  • फॉर्म आणि फी भरा.

  • आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करा.

- Advertisment -

ताज्या बातम्या