Thursday, May 2, 2024
Homeनाशिकवन्यजीवांचे अवयव विक्री करणार्‍यास अटक

वन्यजीवांचे अवयव विक्री करणार्‍यास अटक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

वन्यजीव प्राण्यांचे अवयव (Animal organs) बाळगत ते विक्रीसाठी ठेवल्याचे आढळून आल्याने कोल्हापूर वनविभागाने (Forest Department) नाशिकमधील (Nashik) लक्ष्मी पूजा साहित्य भांंडार (Lakshmi Pooja Sahitya Bhandar) या दुकानावर छापा (Raid) टाकून संशयितास अटक (Arrested) केली आहे….

- Advertisement -

पंचनामा व गुन्हा दाखल करून कोर्टात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वनविभागाच्या विशेष अन्वेषण पथकाकडून (SIT) ही कारवाई करण्यात आली.

ऑक्टोबर 2021 महिन्यात कोल्हापूर (Kolhapur), सांगली (Sangli), सातारा (Satara) जिल्ह्यात झालेल्या विविध पूजा साहित्य भांडारवर झालेल्या कारवाईमध्ये इंद्रजाल (ब्लॅक कोरल), रेड सी फॅन, हत्ता जोडी (घोरपडीचे गुप्तांग) हे वन्यजीव प्रतिबंधित माल विविध दुकानात सापडला होता.

त्या अनुषंगाने पुढे चौकशीमध्ये (Inquiry) माहिती मिळाल्याने सोमवारी (दि.7) नाशिक येथे कोल्हापूर वनविभागाने (Kolhapur Forest Department) कारवाई करत लक्ष्मी पूजा साहित्य भांंडार या दुकानावर छापा टाकून संशयित कैलास बबन कुलथे यास अटक केली.

या दुकानात इंद्राजाल (ब्लॅक कोरल) व हत्ता जोडी(घोरपडचे गुप्त अंग/लिंग) साळींदरचे काटे, रानडुक्कराचे दात व इतर काही वन्यजीव अवयव हे विक्रीसाठी साठा केला असल्याचे आढळून आले.वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 अंतर्गत शेड्युल 1 भाग 1 मध्ये येते, जे बाळगणे व विक्री करणे हा दंडनीय अपराध आहे. त्यासाठी 7 वर्ष कारावास व दहा हजार रुपये दंड आहे.

मुख्य वनसंरक्षक नाशिक नितीन गुदगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई विशेष शोधपथकांने केली. कारवाईमध्ये उपवनसंरक्षक महादेव मोहिते (सातारा) ,विभागीय वनाधिकारी विशाल माळी (कोल्हापूर), मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे (सातारा), सहाय्यक वनसंरक्षक अजित साजणे (सांगली), सहाय्यक वनसंरक्षक गणेश झोळे (नाशिक) वनक्षेत्रपाल युवराज पाटील (सांगली), वनक्षेत्रपाल महेंद्र पाटील (नाशिक) , वनरक्षक सागर थोरवत सांगली, योगेश खैरनार, ज्ञानेश्वर शिंदे, सुरेख कुवर नाशिक तसेच मेळघाट सायबर सेलचे जीवन दहीकर यांनी सहकार्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या