Thursday, May 2, 2024
Homeनगरअकोले आगाराने एसटी च्या फेर्‍या वाढवाव्यात

अकोले आगाराने एसटी च्या फेर्‍या वाढवाव्यात

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या, महिलांच्या, वयोवृद्ध व्यक्तींच्या प्रवासाचे अतोनात हाल होत असून ग्रामीण भागात आठ दिवसात एस टी बसेसच्या फेर्‍या वाढवाव्यात अन्यथा माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली कोणतीही पूर्व सूचना न देता रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष राहुल देशमुख यांनी दिला आहे.

- Advertisement -

आगार प्रमुख व तहसीलदार यांना दिलेल्या लेखी निवेदनात राहुल देशमुख यांनी म्हटले आहे की, अकोले आगाराने लांब पल्याच्या बसेस सुरू करून प्रवाशांना व जनतेला मोठा दिलासा दिला आहे. मात्र ग्रामीण भागात अद्यापपर्यंत एस टी बसच्या फेर्‍या सुरू केल्या नाही. सध्या 12 वी चे ज्यादा तास चालू आहे. बसेस बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आजारी वयोवृद्धाना दवाखान्यात आणण्यासाठी हाल होत आहे.

महिलांचेही जाण्यायेण्यासाठी प्रवासाचे हाल होत आहे. या सर्व बाबींचा गांभीर्याने नोंद घेऊन आठ दिवसांत ग्रामीण भागात एस.टी. बसेसच्या फेर्‍या सूरु करून जनतेला दिलासा द्यावा अन्यथा माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली कोणतीही पूर्व सूचना न देता रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा राहूल देशमुख यांनी दिला. यावेळी भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष राहुल देशमुख, भाजप शहराध्यक्ष सचिन शेटे, उप नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, आरोग्य विभागाचे सभापती शरद नवले, नगरसेवक विजय पवार, बबलू धुमाळ, अमोल वैद्य, मोसीन शेख, प्रसन्ना धोंगडे, तेजस कानवडे, अतुल एखंडे, सुदाम गोरडे, प्रतीक वाकचौरे, अनिकेत जाधव आदी सह भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. हे निवेदन आगार प्रमुख, अकोले, पोलीस निरीक्षक, अकोले व तहसीलदार अकोले यांना देण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या