Sunday, May 5, 2024
Homeनगरस्टीलची चोरी करून विक्री; मुख्य आरोपी गजाआड

स्टीलची चोरी करून विक्री; मुख्य आरोपी गजाआड

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

स्टीलची वाहतूक करणार्‍या वाहनांमधून स्टीलची चोरी करून ते काळ्याबाजारात विक्री प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पसार असलेला आरोपी रामभाऊ सानप (मूळ रा. पाटोदा, जि. बीड, सध्या रा. अहमदनगर) याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

रविवारी पहाटे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या पथकाने अहमदनगर – औरंगाबाद महामार्गावर दोन ठिकाणी छापेमारी करून तब्बल दीड कोटी रुपयांचा माल जप्त केला आहे. याप्रकरणी रविवारी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात 14 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. 13 जणांना पोलिसांनी अटक केली होती.

हॉटेल निलकमल शेजारी असलेल्या पत्र्यांच्या कंपाऊंडमधील मोकळ्या जागेत राजसिंगानिया राजेश्वर सिंगानिय, राहुलकुमार कोलई राव, राजेश राव रामफेर हे रामभाऊ सानप याच्या सांगण्यावरून अहमदनगर – औरंगाबाद महामार्गावरून जाणार्‍या स्टील (असारी) वाहतूक करणार्‍या वाहन चालकांशी संगनमत करून चोरी करत होते. छापा पडताच रामभाऊ सानप पसार झाला होता. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या