Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedगणेशोत्सवासाठी सज्जता

गणेशोत्सवासाठी सज्जता

अंबासन । प्रशांत भामरे | Ambasan

गत दोन वर्ष करोना (corona) संसर्गामुळे गणेशोत्सव (Ganeshotsav) साधेपणाने साजरा करण्यात आल्याने ग्रामीण मुर्तींकारांवर उपासमारीची वेळ आली होती. यावर्षी करोनाचे निर्बंध शिथील (Restrictions will be relaxed) झाल्याने गणेशोत्सव धुमधुडाक्यात साजरा होणार असल्याने मुर्तीकारांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांनी लहान-मोठ्या गणेशमुर्ती निर्मितीच्या कामास जोमाने प्रारंभ केल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

अंबासनसारख्या छोट्याशा खेड्यात गणेशमुर्ती निर्मितीचे दोन छोटेखानी कारखाने असून गत आठ ते दहा वर्षांपासून जयराज कलंकार व हिरामण कलंकार हे कारागीर आकर्षक गणेशमुर्ती घडविण्याचा व्यवसाय करीत आहेत. परंपरागत कुंभाराचा व्यवसाय असल्याने लहानपणापासूनच त्यांना मातीची भांडी बनविण्याचे बाळकडू लाभले आहे.

त्यातूनच गणेशमुर्ती निर्मितीची आवड निर्माण झाल्याने त्यांनी हा व्यवसाय सुरू केला आहे. हातउसनवार आर्थिक भांडवलावर त्यांनी सुरू केलेला हा व्यवसाय अल्पावधीतच वृध्दींगत झाला. त्यांच्या गणेशमुर्तींना नाशिक (nashik), सटाणा (satana), मनमाड (manmad), कळवण (kalwan), देवळा (devla), मालेगावसह (malegaon) गुजरातमधील (gujrat) सुरत (surat), अहमदाबाद (Ahmedabad), सापुतारा (saputara) तसेच दमण (daman) येथून मोठी मागणी असते. गेली दोन वर्ष मात्र करोनामुळे (corona) त्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागले.

गणेशमुर्ती तयार करण्यासाठी काथ्या, शाडू माती, रंग, ब्रश आदी आवश्यक साहित्य मालेगाव येथे मोंठ्या प्रमाणावर मिळते. गणेशमुर्तींचे साचे मात्र धुळे, मालेगाव, पेण, पनवेल येथून मागवावे लागतात. हा व्यवसाय वर्षात किमान 8 ते 9 महिने कालावधीचा असतो. पुरेसे मनुष्यबळ व कुशल कारागिरांअभावी मोठ्या प्रमाणात व्यवसाय करता येत नसल्याचे कलंकार बंधूंनी सांगितले.

गणेामुर्ती बनविण्यासाठी अंग मेहनत घ्यावी लागते. सध्याच्या काळात मात्र प्रत्येकाला कमी श्रमात अधिक पैसा हवा असल्याने या व्यवसायाकडे जास्त प्रमाणात वळण्यास धजावत नाहीत. गत दोन वर्ष करोना महामारीच्या संकटामुळे गणेशमुर्ती निर्मितीवर मोठा परिणाम झाला. मुर्तींच्या उंचीवरही निर्बंध घातले गेले होते. त्यामुळे सार्वजनिक उत्सवाचे कमी प्रमाणात आयोजन झाल्याने मुर्तींना उठाव नव्हता. केवळ घरोघर लहान आकाराच्या गणेशमुर्तींची स्थापना केली गेली.

त्यामुळे आमच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला. यावर्षी शासनाने सर्व निर्बंध शिथील केले असून मुर्तींच्या उंचीवरील मर्यादाही हटविल्यामुळे चांगला व्यवसाय होण्याची अपेक्षा आहे. ठिकठिकाणाहून मोठ्या मुर्तींची मागणी नोंदविली जात असल्याने आम्ही जोमाने मुर्ती निर्मितीच्या कामाला लागलो असल्याचे कलंकार बंधूंनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या